नवापूर l प्रतिनिधी-
शिवसेनेची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. नवापूर परिसरातील राजकीय पक्षांचे पदाधिकारी शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांनी दिली.
शहरात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ. विक्रांत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे म्हणाले, कार्यकर्त्यांनी तालुक्यात अधिकाधिक संघटन मजबूत करावे. प्रत्येक गाव पातळीवर शिवसेनेची शाखा उघडण्यात येईल आणि त्या माध्यमातून जनतेचे प्रश्न कार्यकर्त्यांनी मार्गी लावावेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियोजनामुळे आज कोरोना संसर्गजन्य परिस्थिती आटोक्यात आलेली आहे. नागरिकांनीही शासनाच्या नियमावलीचे पालन करावे.
बैठकीला माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख मनोज चव्हाण, उपजिल्हाप्रमुख गोटू पाटील, तालुकाप्रमुख रमेश गावित,देवका पाडवी, युवासेनेचे नरेंद्र गावित, राहुल टिभे, कल्पित नाईक तसेच आजी माजी पदाधिकारी, शाखाप्रमुख, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल वारुडे यांनी केले व आभार मनोज बोरसे यांनी व्यक्त केले.
लोकं भाजपला कंटाळली
दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेल्या आहेत. त्यात महागाईचा भडका होत आहे निवडणुकीपूर्वीच्या घोषणांच्या भाजप नेत्यांना विसर पडून गेला आहे. त्यामुळे लोक भाजपला कंटाळलेली आहेत. नवापूर परिसरातील राजकीय कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर असून लवकरच त्यांच्या प्रवेश होणार असल्याचे बैठकीत जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे यांनी सांगितले.