Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कोळदे गटातून सुप्रिया गावितांची होणार राजकीय एन्ट्री ? म्हसावद गटात दिग्गज नेत्याच्या पत्नीची चर्चा

team by team
July 3, 2021
in राजकीय
0
कोळदे गटातून सुप्रिया गावितांची होणार राजकीय एन्ट्री ? म्हसावद गटात दिग्गज नेत्याच्या पत्नीची चर्चा
नंदुरबार । प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी अद्याप काही गटातील पक्षातील उमेदवार निश्चित झालेले आहेत.तर काही पक्षांनी  अद्याप आपले पत्ते खुले केलेले नाहीत.असे असताना नंदुरबार तालुक्यातील कोळदे गटातून माजी मंत्री आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या द्वितीय कन्या तथा खा.डॉ.हीना गावित यांच्या लहान भगिनी डॉ.सुप्रिया गावित या कोळदे या जि.प. गटातून उमेदवारी करून ‘राजकीय एन्ट्री’ घेणार आहेत. भाजपातर्फे इच्छुक उमेदवाराच्या आज मुलाखती घेण्यात आल्या. त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 11 गटांचा पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवसापर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक असून काहींचे राजकीय पुनर्वसन तर काहींचा राजकीय बळी जाणार आहे. कोळदे ता.नंदुरबार या गटात भाजपाच्या योगिनी अमोल भारती या निवडून आल्या होत्या. मात्र, पोटनिवडणुकीत त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता असून त्यांच्या जागी आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या द्वितीय कन्या तथा खा.डॉ. हीना गावित यांच्या भगिनी डॉ.सुप्रिया गावित यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे समजते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून डॉ.सुप्रिया राजकीय एन्ट्री घेणार आहेत.
 त्यामुळे योगिनी अमोल भारती यांना डच्चू मिळणार की त्यांचे दुसऱ्या गटातून राजकीय पुनर्वसन होणार? याबाबत देखील चर्चा सुुरु आहे.
असाच प्रकार शहादा तालुक्यातील म्हसावद गटाबाबत आहे.या ठिकाणचे उमेदवार बाबत अनेक चर्चा आहेत.मात्र सगळ्याच पक्षांनी आपली पत्ते झाकून ठेवली आहे.या गटात जिल्ह्यातील एक दिग्गज नेत्यांची पत्नी उमेदवारी करणार असल्याची शक्यता आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर तालुक्यात वन विभागाने जप्त केले एक लाखाचे अवैध लाकूड

Next Post

कोळदा व खापर गटातुन डॉ.सुप्रिया गावीत तर कोपर्ली गटातुन ऍड.राम रघुवंशी यांचे नामांकन दाखल

Next Post
कोळदा व खापर गटातुन डॉ.सुप्रिया गावीत तर कोपर्ली गटातुन ऍड.राम रघुवंशी यांचे नामांकन दाखल

कोळदा व खापर गटातुन डॉ.सुप्रिया गावीत तर कोपर्ली गटातुन ऍड.राम रघुवंशी यांचे नामांकन दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026
पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

पक्ष संघटना मजबूत करा,माजी आ. शिरीष चौधरी

May 19, 2026
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना दिलासा; 953 शेतकरी लाभार्थी

May 19, 2026
नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

नंदुरबार जिल्हा परिषदेकडून ‘नो व्हेईकल डे’ उपक्रम

May 19, 2026
बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

बेथेल कॉलनीमधील विकास कामांचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन

May 16, 2026
भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

भालेर येथे भव्य रोजगार मेळाव्यांचे आयोजन

May 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add