शहादा l प्रतिनिधी
तालुक्यातील शेकडोंवर ग्रामस्थांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला. यात ग्रामपंचायत सदस्यांच्या समावेश असून, शिवसेना संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पक्षाचा गमछा देऊन स्वागत केले.
शहादा तालुक्यातील कन्साई ग्रामपंचायतीचे सदस्य लक्ष्मण पवार, सुनील ब्राह्मणे, सुदाम पवार व माजी सदस्य दोग्या पाडवी यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी प्रवेश केला त्याचप्रमाणे रायखेड,नांदेरखेडा, कुढावद गावातील ग्रामस्थांच्या प्रवेश झालेल्यांमध्ये समावेश आहे.शिवसेना संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पक्षाचा गमछा देऊन स्वागत करीत त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल, शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्हा उपप्रमुख डॉ.राजेंद पेंढारकर,माजी नगर सेवक सुपडू खेडकर,रवी जमादार,माजी नगरसेवक हिरालाल अहिरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उप सभापती छोटू पाटील,राजरत्न बिरारे,हितेंद्र वर्मा,विजय गायकवाड,,जयसिंग ठाकरे,एकनाथ ठाकरे,अशोक वसावे योगेश कोठारी,महेश पाटील,धनराज जायसवाल प्रवीण सैदांणे,प्रवीण बोरदेकर,मनोज पाथरवट उपस्थित होते.