नंदुरबार l प्रतिनिधी
सध्या बऱ्याच भागांमध्ये अनेक दिवसापासून पाऊस नाही आणखीन काही दिवस पाऊस झाला नाही तर संकट निर्माण होऊ शकते ते संकट टळावे यासाठी आपण शनी देवाला प्रार्थना केली आहे. जिल्हा परिषदेच्या वर्ग खोल्यांसह गावातील विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू असे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनिमांडळ येथे केले.
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जनविश्वास सप्ताह अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व कांतालक्ष्मी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आरोग्य रोगनिदान शिबिराचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे, जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, मोहन शेवाळे, नरेंद्र नगराळे, तीलाली गावाच्या सरपंच स्मिता मधुकर पाटील, तलवाडे गावाच्या लताबाई गिरासे, तालुकाध्यक्ष मोंटू जैन, मालती वळवी, माजी जि प सदस्य डॉ सयाजी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्री. कोकाटे यांनी सांगितले की,राज्यात बऱ्याच भागांमध्ये अनेक दिवसांपासून पाऊस नाही आणखीन काही दिवस पाऊस जर नाही झाला तर पावसाअभावी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते ते नुकसान टळावे यासाठी आपण शनि देवाला साखळे घातले त्यासोबतच शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी देखील आपण शनि देवाकडे प्रार्थना केली आहे. तसेच जिल्ह्यात 140 वर्ग खोल्या नियोजन मंडळातून मंजूर केले आहे त्या कामाला लवकरच सुरुवात होईल त्यातून शनिमांडळ येथील जिल्हा परिषद शाळेला नव्याने व चांगल्या दर्जाचे वर्ग खोल्या बनवून दिल्या जातील यासोबत विविध विकास कामासंदर्भात आपण कटिबद्ध राहू असे त्यांनी सांगितले.
राज्यात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना आणण्यासाठी दरवर्षी 5000 करोड प्रमाणे पाच वर्षात 25 हजार करोड रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या साठी शासन मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू असे त्यांनी सांगितले.
शनि देवाला प्रार्थना
राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आरोग्य शिबिराच्या पूर्वी शनिमांडळ येथील साडेसाती मुक्तीसाठी प्रचलित असलेले शनि देव मंदिरात सुरुवातीला दर्शन करून पूजन केले व आरती केली. त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष डॉ अभिजीत मोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शेतकरी व जनतेच्या तसेच राज्याच्या साठी त्यांनी प्रार्थना केली.
शनिमांडळ येथे आरोग्य शिबिरात 320 रुग्णांची तपासणी करण्यात आली .
तसेच नेत्र रुग्ण 165 तपासणी करण्यात आली त्यातून 54 रुग्ण रुग्ण ऑपरेशन साठी निवडण्यात आले त्यांचे ऑपरेशन मंगळवारी 29 तारखेला कांतालक्ष्मी रुग्णालय येथे शस्त्रक्रिया होणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिका भोई यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मधुकर पाटील यांनी केले.