नंदुरबार l प्रतिनिधी
शिंदगव्हाण ता. नंदुरबार येथे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना दप्तर व शालेय वस्तू वाटप करण्यात आल्या.
शिंदगव्हाण येथील राकेश दत्तू पाटील यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर ,वही, पेन, पेन्सिल, दगडी पाटी, उजळणी पुस्तकाचे वाटप शिंदगव्हाण गावाच्या सरपंच सौ. विद्या विनायक पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच सौ.मंगलाबाई विनायक पाटील, ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष सौ.अनिता ज्ञानेश्वर पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष भीमा भिल, गटनेते विनायक पाटील, गोविंद पाटील, ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व, मुख्याध्यापीका सौ शालिनी पाटील शिक्षक कालुसिंग राऊत सौ संगीता माळी विजय चौधरी सागर पाटील सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.