नंदुरबार l प्रतिनिधी
के.डी.गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पथराई येथे लोकमान्य टिळक जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या असते अध्यक्षस्थानी प्राचार्य शरद पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून डी.पी. गावीत आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुयोग व्यास व प्रा.डॉ. मयूर कुलकर्णी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
डॉ.मयूर कुलकर्णी यांनी संस्कृत भाषेतून भाषणाला सुरुवात करत कोणतेही काम प्रामाणिकपणे केल्यास आयुष्यात मिळणाऱ्या संधी ह्या उत्तमच असतात असे सांगून टिळकांनी अंगीकारलेला कर्मयोग सांगितला.
तर प्राचार्य डॉ. सुयोग व्यास यांनी टिळकांच्या अंगी असलेले साहस, धाडस, कर्मठता आणि शिस्त हे गुण सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांत असल्याने ते प्रत्यक्ष टिळक अनुभवत आहेत असे मत व्यक्त केले .
अध्यक्षीय भाषणात पाटील यांनी टिळकांचा संदर्भ देत धाडस, स्वावलंबन आणि शिक्षणामुळे पुढे जाणं शक्य आहे असे मत व्यक्त केले.
वकृत्व स्पर्धेचे आयोजन लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, त्यात रोहित शिवाजी राऊत प्रथम, खुशाल शरद पाटील द्वितीय ,तर सुशील भरत नाईक व शुभम नितीन वसावे या विद्यार्थ्याचा तृतीय क्रमांक आला.
स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रल्हाद संदानशिव श्रीमती रजनी करेले व प्रवीण शिवदे यांनी काम पाहिले.
कार्यक्रमात सुरेश नितोने या विद्यार्थ्याने लोकमान्य टिळकांचा पेहराव करून संस्कृत संवादावर अभिनय सादर केला.
कार्यक्रमाचे आयोजन इकबाल शहा, रोहित पाटील ,श्रीम चती स्वाती पाटील ,व काशिनाथ सूर्यवंशी यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आय. बी. शहा यांनी केले.