नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या जिल्हयातील सिंचन प्रश्नांसह अनेक प्रश्नांवर जातीने तक्ष दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या जिल्हयाता मंत्रीपदही दिले. त्या माध्यमातून आदिवासींच्या घराघरात योजना पोहचल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी करण्यासाठी सर्वांनी परीश्रम घ्यावे.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून दया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांनी मलगाव ता. शहादा येथे पक्ष प्रवेश मेळाव्यात केले. या पक्ष मेळाव्यात. मलगाव व परीसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी जल्लोषात प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आयोजित पक्ष प्रवेश मेळावा कार्यक्रमाला ज्येष्ठ मार्गदर्शक माधव चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हाउपाध्यक्ष मोहन शेवाळे, इंजि जेलसिंग पावरा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, जिल्हाउपाध्यक्ष प्रकाश पवार, चिंतामन पाटील, शहादा तालुका अध्यक्ष संतोष पराडके, ओबीसी सेलचे राजेंद्र बाविस्कर, शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, छोटू कुंवर, संजय खंदारे, राजू सोनवणे, राजू गिरासे, मालती वळवी, शहादा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत पटले, सोहेबभाई खाटीक, रविंद्र लोंढे, मलगाव येथील कार्यकर्ते भिमा तिरसे, सुरेश पावरा, चेतन पावरा, गोविंद शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. अभिजित मोरे म्हणाले, होऊ घातलेल्या आगामी पंचायत समिती व जि प निवडणूकीत जास्तीत जास्त सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे कसे निवडून येतील, यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यायची आहे. राज्यात नऊ टक्के संख्येने असलेल्या आदिवासी समाजाला 9 टक्के निधी मिळवून देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा वाटा आहे. आदिवासी, दीन दुबळे, दलीत, मुस्लीम यांसह वंचित घटकांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी पक्ष कटीबध्द्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही राजकारणाला महत्व दिले नाही. सामान्य जनतेचा विकास झाला पाहिजे, त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, पाचा विचार करीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाटचाल करीत आला आहे. शहादा तालुक्यात जेवढे धरणे बांधली आहेत ती सर्व अजीतदादा पवार यांच्या काळात झालेली आहेत, नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर या जिल्हयाच्या विकासाला सुरुवात झाली. त्यानंतर वारंवार मंत्रीपदे मिळाली, कुठल्याही योजना लागू करण्यासाठी नंदुरबारची निवड केली जाते. हा इतिहास युवकांना माहिती असायला हवा, यावेळी मोहन शेवाळे, मालती वळवी यांनी मेळाव्याता संबोधीत केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे भिमा तिरसे यांच्या नेतृत्वाखाली मलगावातील मगन गुलवणे, मोहन तिरसे, निखील वसावे, करण गुलवणे, मंगलसिंग पटले, उजन तिरसे, जगर तिरसे, अविनाश तिरसे, शंकर तिरसे, वासुदेव गेंद्रे, मनीलाल भामरे, रवी तिरसे, जला भामरे, रविन गेंद्रे, दिनेश तिरसे, राहुल गुलवणे, अश्वीन पाडवी, सागर वाघ, दिपक नावडे, लखन डामरे, रोहन तिरसे आदीं शेकडो कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, रणजित राजपूत यांनी सूत्रसंचालन केले तर छोटू कुंवर यांनी आभार मानले. यावेळी आदिवासी पारंपारीक ढोल वाजवून स्वागत करण्यात आले. रवींद्र लोंढे यांची सामाजिक न्याय नंदूरबार शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येवून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.