नंदुरबार l प्रतिनिधी
माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित परिवाराच्या नेतृत्वावर आणि विकासात्मक कार्यपद्धतीवर विश्वास दर्शवून नंदुरबार तालुक्यातील तलवाडे बुद्रुक गावातील शिवसेना शिंदे गटातील सरपंच सुनील पाटील, उपसरपंच हिरालाल पाटील, काही ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो ग्रामस्थ यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश घेतला.
यामुळे नंदुरबार तालुक्यातील आणखी एका गावात शिवसेना गटाला भगदाड पडले आहे. याप्रसंगी संसद रत्न माजी खासदार डॉ हिना गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित,भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील, सागर तांबोळी,प्रफुल पाटील आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाच्या गळ्यात पक्ष चिन्ह असलेला स्कार्फ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्य सुदाम पाटील, नाना पाटील, सतीलाल भील, दारासिंग भील, रायसिंग भील,नरेश पाटील, साहेबराव पाटील, किसन पाटील, अधिकार पाटील,गणेश पाटील, गुलाब पाटील, युवराज पाटील, अरुण पाटील दशरथ पाटील योगेश पाटील संजय मालचे नानाभाऊ भील भटू पाटील अंबालाल पाटील ब्रिजलाल पाटील चतुर पाटील दौलत पाटील बाजीराव पाटील आनंदा पाटील बारका पाटील उमेश पाटील भैय्या पाटील मनोहर पाटील रघुनाथ भील ताणका भील संजय पाटील दिनेश पाटील मका पाटील मल्हारी पाटील कमलेश पाटील यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवत निवासस्थानी जाहीर प्रवेश केला.
प्रत्येक गावातील ग्रामीण जनतेसाठी रस्ते पाणी वीज तसेच महिलांना व तरुणांना रोजगार देण्या संबंधित विकासकाम डॉक्टर विजयकुमार गावित हेच करू शकतात हे त्यांनी मागील तीस वर्षात वारंवार दाखवून दिले आहे म्हणून आम्ही गावित परिवाराच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला; अशी प्रतिक्रिया या ग्रामस्थांनी दिली.