नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार शहरातील ग्राम दैवत असलेल्या खोडाई माता मंदिरात भरधाव कार घुसली.त्याठिकाणी खेळणारी 13 वर्षीय बालिका गंभीर जखमी झाल्याची घटना 22 जुलै दुपारी 3 वाजे दरम्यान घडली.
नंदुरबार शहरातील खोडाई माता मंदिराजवळ वैदू समजाचा कार्यक्रम सुरू होता.त्यावेळी 13 वर्षीय बालिका अंजली राजू वैदू ही मंदिरात खेळत होती.त्याच वेळी तेथून जाणारी कार ( क्र.एम.एच.39, ए.बी.8989) तेथून भरधाव वेगाने जात असताना चालकाचे कर वरील नियंत्रण सुटल्याने कार थेट खोडाई माता मंदिरात घुसली.त्या वेळी तेथे खेळणाऱ्या अंजली राजू वैदू गाडीचा धक्का लागल्याने गंभीर जखमी झाली.तिला नातेवाईकांनी लगेच खाजगी रुग्णालयात दाखल केले.त्या ठिकाणी नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला. कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.