Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘ईद-ए-मिलाद’ साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन

team by team
October 18, 2021
in राज्य
0
‘ईद-ए-मिलाद’ साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन
नंदुरबार l प्रतिनिधी-
कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीची ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी ) साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या अनुषंगाने नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन अप्पर जिल्हादंडाधिकारी सुधीर खांदे केले आहे.
यावर्षी 19 ऑक्टोबर किंवा 20 ऑक्टोंबर 2021 रोजी ( चंद्रदर्शनावर अवलंबून ) ईद-ए-मिलाद साजरी करण्यात येणार असून कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे  मोठया संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहे. त्यामुळे ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी )  शक्यतोवर घरात राहूनच साजरी करावी. तथापि, मिरवणुका काढावयाच्या असल्यास पोलीस प्रशानाच्या पूर्वी परवानगीनेच एका मिरवणूकीत जास्तीत जास्त 5 ट्रक आणि एका ट्रकवर जास्तीत जास्त 5 इसमास परवानगी राहील. मिरवणूकादरम्यान मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक असेल.
मिरवणूकीत सक्षम प्राधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीने ध्वनी प्रक्षेपणाची व्यवस्था केल्यास ध्वनीप्रदुषण नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. मिरवणूकीच्या दरम्यान मिरवणूकीच्या स्वागतासाठी पंडाल बांधावयाचे असल्यास शासनाच्या नियमानूसार संबंधित नगरपालिका, पोलीस व स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. सदर पंडालमध्ये एकावेळी किती उपस्थिती असावी याबाबत स्थानिक प्रशासनाने ठरविलेल्या विहित नियमांचे पालन करावे.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 24 सप्टेंबर 2021 रोजीच्या आदेशातील नियमांचे काटेकोर पालन करुन मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर राखुन धार्मिक प्रवचन करण्यास परवानगी देण्यात येत आहे. प्रवचनाचे कार्यक्रम शासनाच्या नियमांचे पालन करुन शक्यतो ऑनलाईन पध्दतीने आयेाजित करण्यात यावेत. केबल, टि.व्ही,फेसबुक इत्यादी माध्यामातून थेट प्रेक्षपणाद्वारे इतरांना पाहण्याची व्यवस्था करावी.
सबील, ईद-ए-मिलाद (मिलादुन नबी ) निमित्त मिरवणूकीच्या रस्त्यावर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या स्मरणार्थ पाण्याचे तात्पुरते सबील ( पाणपोई ) लावण्यात येतात. सबील बांधण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाची परवानगी घ्यावी, त्याठिकाणी 5 पेक्षा जासत व्यक्तींनी उपस्थित राहू नये, याठिकाणी सिलबंद पाण्याच्या बाटलीचे वाटप करण्यात यावे,सबीलच्या ठिकाणी स्वच्छता राखावी व सामाजिक अंतराचे पालन करावे.
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सद्या लागू करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील, त्यामध्ये कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही. कोविड-19 परिस्थितीचा विचार करता रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे असे उपक्रम राबण्यिात यावेत, व या उपक्रमांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करावी. वरील सूचनाव्यतिरिक्त स्थानिक परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकार संबंधित नगरपालिका, पोलीस व स्थानिक प्रशसनाला असतील.
कोविड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन आरोग्य पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगर पालिका, नगर पंचायत,पोलीस , स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. सदर परिपत्रक नंदुरबार जिल्ह्याच्या सिमा क्षेत्राकरीता लागू राहील कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 , साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

प्रतापपुर येथे जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश, भावाचा खून करून मृतदेह फेकला होता बोअरवेलमध्ये

Next Post

जिल्ह्यात निम्स हॉस्पिटलमध्ये पहिली कोरोनरी अँजिओग्राफी, १२ तासात झाल्या ३० एन्डोस्कोपिक युरो शस्त्रक्रिया, पिवळे व केसरी रेशन कार्ड धारक पात्र रुग्णांसाठी मिळणार अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी उपचार

Next Post
जिल्ह्यात निम्स हॉस्पिटलमध्ये पहिली कोरोनरी अँजिओग्राफी, १२ तासात झाल्या ३० एन्डोस्कोपिक युरो शस्त्रक्रिया, पिवळे व केसरी रेशन कार्ड धारक पात्र रुग्णांसाठी मिळणार अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी उपचार

जिल्ह्यात निम्स हॉस्पिटलमध्ये पहिली कोरोनरी अँजिओग्राफी, १२ तासात झाल्या ३० एन्डोस्कोपिक युरो शस्त्रक्रिया, पिवळे व केसरी रेशन कार्ड धारक पात्र रुग्णांसाठी मिळणार अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी उपचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयाचा अभ्यास दौरा

February 2, 2026
डॉ.विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा जंबो स्वरूपात क्रीडा स्पर्धा होणार,विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे समस्त क्रीडापटूंना आवाहन

भारत बनतोय जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था : माजी खा.डॉक्टर हिना गावित

February 2, 2026
अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

अभय योजनेतून ५० टक्के दंड माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवणार : आ. चंद्रकांत रघुवंशी

February 2, 2026
नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

नंदुरबार नगरपालिकेची अजितदादा पवारांना अनोखी श्रद्धांजली

February 2, 2026
नंदुरबार जिल्हाविकासाला हातभार लावणारे कणखर नेतृत्व हरपले : माजी खा. डॉ. हिना गावित

अजितदादांचा अस्थिकलश उद्या नंदुरबारात जिल्हावासीयांना घेता येणार दर्शन

February 2, 2026
अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

अजितदादांना श्रध्दांजलीसाठी रनाळे गाव कडकडीत बंद

January 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add