नवापूर ! प्रतिनिधी
वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार नवापूर व चिंचपाडा वन विभागाच्या पथकाने शुक्रवारी ( ता .२ ) बारी ( ता . नवापूर ) गावात आनंद कोकणी यांच्या घराची सर्च वॉरंटने झडती घेतली . त्यात सागवानी लाकडाचे ४४ नग कट साईज १.१८० घनमीटर माल मिळून आला . त्याची बाजारभावानुसार अंदाजित किंमत एक लाख रुपये आहे . हा अवैध लाकूडसाठा नवापूर वन विभागाच्या आगारात जमा केला .
नंदुरबार वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक , वनविभाग शहादा ( प्रादेशिक व वन्यजीव ) धनंजय पवार यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून नवापूर वनक्षेत्रपाल राजेंद्र पवार , वनपाल डी . के जाधव , बी . एस . दराडे , के . एम . बडूरे , वनरक्षक एस . बी . गायकवाड , डी . डी . पाटील , एन . आर . पाटील , एस .ए . खैरनार , एस . डी . बडगुजर , आर . के . पावरा , के . एन . वसावे , एल . एस . पवार , ए . जी . पावरा , ए . बी . पावरा , ए . आर . वळवी , वाहनचालक चमाऱ्या गावित व वनमजूर अनील गावित , वनकर्मचाऱ्यांसह बारी गावात जाऊन कोकणीच्या घराची झडती घेत कारवाई केली . कारवाईत नवापूर व चिंचपाडा वन विभागाचे वनक्षेत्रपाल , वनपाल , वनरक्षक , वाहनचालक यांनी भागघेतला . पुढील कार्यवाही धुळे मुख्य वनसंरक्षक डी . व्ही . पगार , उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा पी . के . बागूल , उमेश वावरे , धुळे विभागीय वनाधिकारी दक्षता यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.सहाय्यक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग , शहादा यांनी वन व वन्यजीव तसेच कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ टोल फ्री नंबर १ ९ २६ वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे