नंदुरबार l प्रतिनिधी –
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत शासकिय कृषि महाविद्यालय नंदूरबार यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व पालक मेळावा- नंदरंग २०२५ संपन्न झाला.
कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे होते तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. यू. बी. होले होते.यावेळी पोलीस निरीक्षक विवेक पाटील,सौ. पाटील, विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ.पी.पी.गिरासे, प्रभारी सहाय्यक कुलसचिव प्रा.एस.डी पाटोळे, प्रा. एस. जी. राजपूत तसेच विद्यार्थी परिषद सभापती दिव्येश साळुंखे व सचिव कु. स्नेहा ठाकरे, उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. श्री. भामरे यांनी उत्कृष्टतेचा आग्रह धरणे, वेळचे व्यवस्थापन, सातत्य, चांगली सवय निर्माण करणे आणि सोशल मीडियाचा चांगला वापर या पाच अतिशय महत्त्वाच्या मूल्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. यु. बी. होले यांनी कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी व त्यांच्या पालकांशी संवाद साधला व महाविद्यालयाच्या वाटचाली संबंधित आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कामांची चर्चा केली. पारितोषिक विजेते विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ.पी.पी गिरासे यांनी महाविद्यालयाच्या ११ वर्षाच्या प्रगतीचा आढावा मांडला.
विद्यापीठ आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेतील खो-खो सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थी संघाचे गौरवचिन्ह, पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला व संघातील विद्यापीठाकडून अश्वमेध स्पर्धा खेळणारे दोन खेळाडू महेश गावंडे व वामन चौधरी यांचा विशेष गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी गुणवंतांच्या सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय उपाध्यक्ष, विद्यार्थी परिषद डॉ. पी. पी. गिरासे यांनी केला तर मान्यवरांचे आभार विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. एस. जी. राजपूत यांनी मानले.
सूत्रसंचालन राजवर्धन खैरनार,मनीषा चौरे,प्रिया साबळे, मयुरी चौरे, गिरीश बाबर व सायली वाघमोडे या विद्यार्थ्यांनी केले.