नंदुरबार l प्रतिनिधी-
सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्टर करणाऱ्या विरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
3 मार्च 2025 रोजी नंदुरबार पोलीस सोशल मिडियावर लक्ष ठेऊन असतांना गोपनीय माहिती मिळाली कि, इन्स्टाग्रामवर अकाउंट असलेल्या एका मोबाईल क्रमांक धारकाने महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली आहे, अशी माहिती मिळाली. मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे अकाउंट धारकाचा शोध घेता साबीर मोहम्मद उर्फ काल्या आरीफ मोहम्मद बिस्ती, रा. नंदुरबार यास ताब्यात घेण्यात आले.
सदर इसमाने आपले आक्षेपार्ह पोस्टमुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होईल अशाप्रकारचे कृत्य केल्याने त्याचे विरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 196(1) (a), 196(1) (a), 353(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरु आहे.
” तरी नागरिकांनी दोन धर्मात तेढ निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग होईल अशी कोणतीही अनुचित पोस्ट/व्हिडिओ/वायरल करु नये. आपले पोस्ट/वक्तव्यामुळे कुठल्याही धर्माची अथवा समाजाची भावना दुखावणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. तसेच नागरिकांनी जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणेसाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. नंदुरबार सायबर सेल अशा प्रकारचे सोशल मिडियावर गैरसमज व अफवा पसरविण्या-यांवर विशेष लक्ष ठेवून आहेत. नागरिकांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस/पोस्ट दिसून आल्यास त्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष अथवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधवा, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी यावेळी केले आहे.