नंदुरबार l प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त स्पर्श नर्सिंग होम स्त्रियांची शारिरीक व मानसिक आरोग्याची काळजी घेणार आहे. आठ मार्च रोजी महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबत युवती तसेच महिलांसाठी 10 ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवणार आहेत.
नंदुरबार शहरातील स्पर्श नर्सिंग होम वर्षभरात महिलांसाठी विविध उपक्रम राबवत असतो. मागील वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त मुली जन्माला आल्यानंतर मोफत उपचार केला होता. तसेच वर्षभर महिलांना मोफत समुपदेशन शिबिराचेही आयोजन करण्यात येते. यंदा स्पर्श नर्सिंग होम स्त्रियांची शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणार असून. जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च शनिवार रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजे दरम्यान प्लॉट नं. २३, विरल विहार, खोडाई माता रोड, नंदुरबार येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य शिबिरात मोफत समुपदेशन, स्त्रिरोग तपासणी,वंध्यत्व तपासणी, कॅल्शिअम चाचणी,हिमोग्लोबिन चाचणी, थॉयरॉईड चाचणी,वैद्यकिय चाचणी मोफत करण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिरात जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ.प्रिती पी. ठाकरे यांनी केले आहे.
दरम्यान जागतिक महिला दिनानिमित्त स्पर्श नर्सिंग होमतर्फे नंदुरबार शहरातील शासकीय कार्यालय तसेच शाळांमध्ये अशा 10 ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहे.