नंदुरबार l प्रतिनिधी-
सिंदगव्हान ता. नंदुरबार येथे सौ. विद्या विनायक पाटील यांची सरपंच पदी तर सौ.मंगला विनायक पाटील यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाली.
निवडणूक अधिकारी म्हणून खोंडामळीचे मंडळ अधिकारी श्री.पानपाटील होते त्यांना ग्राम विस्तार अधिकारी किशोर शिरसाट यांनी निवडणूक कामी मदत केली. सिंदगव्हान ग्रामपंचायतीची निवड फेब्रुवारी २०२० मध्ये झाली. निवडणुकीत विद्या विनायक पाटील, मंगला विनायक पाटील, निर्मला खुशाल पाटील, निता भरत पाटील, मंगला देवराव पाटील, वैशाली हिम्मत भिल , विनोद बन्सीलाल पाटील, प्रदीप बलवंत बोरसे, अमरसिंग राजाराम भील आदी नऊ सदस्य निवडून आले.सर्वानुमते सरपंचपद प्रत्येकी एक वर्ष देण्याचे ठरले. शेवटच्या टर्म साठी विद्या विनायक पाटील व उपसरपंचपदी मंगला विनायक पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
यावेळी भरत पाटील, राकेश पाटील, विनायक पाटील, के. बी. पाटील, डॉ. योगेश पाटील, विनोद पाटील, छोटू पाटील, एकनाथ पाटील, अभिमन्यू पाटील, विजय पाटील गुलाब पाटील आदीसह सरपंच उपसरपंच यांना शुभेच्छा दिल्या.