Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सीसीटीव्हीसह सर्व उपाययोजना अमलात आणण्यासाठी यंत्रणा कामाला लावणार; माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित

team by team
February 19, 2025
in राजकीय
0
सीसीटीव्हीसह सर्व उपाययोजना अमलात आणण्यासाठी यंत्रणा कामाला लावणार; माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी-

संशयावरून पोलिसांनी सराफांना सरळ ताब्यात घेण्यासंदर्भातील कायद्यात शिथिलता आणली जावी यासाठी सरकारी स्तरावर वेगाने पाठपुरावा केला जाईल, सराफ बाजारातील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याच्या संदर्भाने सीसीटीव्ही सह सर्व उपाययोजना अमलात आणण्यासाठी यंत्रणा कामाला लावली जाईल तसेच सुवर्णकार समाज भवन उभारणीतील सर्व अडचणी तत्परतेने सोडवल्या जातील, असे भारिव आश्वासन महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार शहरातील सराफ बाजारपेठेतील भेटी प्रसंगी दिले.

 

महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी नंदुरबार शहरातील सर्व भागांमध्ये जाऊन लोकांशी संवाद करण्यासाठी आणि समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी जनसंवाद उपक्रम हाती घेतला आहे. त्या अंतर्गत जय हिंद कॉलनी परिसरानंतर त्यांनी सोनार खुंट परिसरात भेट दिली आणि सराफ बाजारातील सर्व व्यापारी बांधवांशी एकत्रित बसून चर्चा केली.

 

 

उपस्थित व्यापारी बांधवांनी विविध समस्या याप्रसंगी मांडल्या. सराफ बाजारपेठेमध्ये सुरक्षेचा प्रश्न महत्त्वाचा असून त्यासाठी सीसीटीव्ही आवश्यक असताना आतापर्यंत पाहिजे तसा बंदोबस्त झालेला नाही. कुठेही चोरी झाल्यानंतर चोरीचे दागिने खरेदी केल्याच्या संशया खाली सर्वप्रथम सोने चांदी व्यापाऱ्यांना बिनपुराव्याचे ताब्यात घेतले जाते परिणामी संबंध नसलेल्या प्रकरणात सुद्धा व्यापाऱ्यांना मनस्ताप झेलावा लागतो आणि वेळेची तसेच आर्थिक हानी सोसावी लागते. म्हणून सोने चांदी विक्रेत्यांना पोलिसांनी सरळ ताब्यात घेण्याविषयीच्या कायदे नियमात योग्य तो बदल घडवण्यासाठी राज्य सरकारकडे बाजू मांडली जावी, असे उपस्थित व्यापारी बांधवांनी सांगितले. त्याचबरोबर निधी मंजूर असतानाही रखडलेले समाज भवन, रस्ते, वाहतूक नियमन आणि तत्सम विषय देखील मांडण्यात आले.

 

 

त्यावर बोलताना आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आश्वस्त केले की, सोने चांदी व्यापारी तथा विक्रेते यांना पोलिसांनी सरळ ताब्यात घेण्या संदर्भाने कायद्यात योग्य ती शिथिलता आणली जावी यासाठी मुख्यमंत्री यांची भेट घेऊ. याच्यापूर्वीच मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत या संदर्भाने संकेत देण्यात आले होते अशी माहिती देऊन डॉक्टर विजयकुमार गावित पुढे म्हणाले की, येत्या पाच वर्षात शहरवासीयांच्या कोणत्याही समस्या शिल्लक राहणार नाही याकडे मी व्यक्तिगत लक्ष देणार आहे. याच्यापूर्वी कोणत्याही नेत्याने दिलेला नाही इतका निधी प्रत्येक समाजाच्या समाजभावनासाठी आपण मिळवून दिला.

 

सुवर्णकार समाज भवन उभारणीसाठी याच्यापूर्वीच निधी मंजुरी मिळवली आहे तथापि ज्या काही पूर्तता राहिल्या असतील त्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील. सीसीटीव्ही बसवले जावे यावर मी स्वतः आग्रही आहे म्हणूनच एक वर्षांपूर्वी डीपीडीसी मिटिंग मध्ये संबंधितांना सूचना करण्यात आल्या होत्या. नगरपालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांना योग्य ती पूर्तता लवकरात लवकर करण्यास सांगण्यात आलेले आहे असे याप्रसंगी डॉक्टर गावीत म्हणाले.

 

या बैठकीला सराफ व्यापारी बांधव दिलीप सराफ, मनोज श्रॉफ, पांडुरंग सराफ, सत्यवान सोनार, सुमित सराफ, राजू सोनार, देवेंद्र सोनार, भरत सोनार, चंद्रशेखर सोनार, मोरेश्वर सोनार, जयेश माहेश्वरी, आशिष सोनार, राजेंद्र सोनार, जिग्नेश सोनार, दर्शन सोनार, मनोहर सराफ,गजेंद्र सोनार, सचिन सोनार, मनोज भंसाली, आकाश चौधरी, निर्मल जैन गोकुळ सोनार आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जनसंवाद उपक्रमातून शहरवासीयांच्या समस्या सोडवणार ; डॉ.विजयकुमार गावित यांनी जय हिंद कॉलनीतून केला प्रारंभ

Next Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त “जय शिवाजी जय भारत” यात्रेने वेधले शहरवासीयांचे लक्ष

Next Post
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त “जय शिवाजी जय भारत” यात्रेने वेधले शहरवासीयांचे लक्ष

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त “जय शिवाजी जय भारत” यात्रेने वेधले शहरवासीयांचे लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add