नंदुरबार l प्रतिनिधी-
जिल्ह्यात ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, 2017 नुसार रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत ध्वनिक्षेपक वापरण्यास बंदी आहे. मात्र, जिल्ह्यातील नागरिकांच्या धार्मिक, पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी चालू वर्षात 15 दिवसांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास विशेष परवानगी दिली आहे.
*सवलतीचे सण*
• शिवजयंती- 17 मार्च 2025 (सोमवार) 1 दिवस
• डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती- 14 एप्रिल 2025 (सोमवार) 1 दिवस
• मोहरम- 27 जून 2025 (शुक्रवार) 1 दिवस
• गणेशोत्सव दि. 7, 8, 12 आणि 16 सप्टेंबर 2025- 4 दिवस
• नवरात्र उत्सव दि. 3 आणि 11 ऑक्टोबर 2025- 2 दिवस
• दिवाळी (लक्ष्मीपूजन) 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर 2025- 1 दिवस
• ख्रिसमस- 25 डिसेंबर 2025 (गुरुवार) 1 दिवस
• 31 डिसेंबर (नववर्ष स्वागत)- 31 डिसेंबर 2025 (बुधवार)- 1 दिवस
• उर्वरीत 3 दिवस महत्वाचे सण, उत्सव, कार्यक्रमांसाठी राखीव.
*एकूण सवलतीचे दिवस : 15*
*अटी व शर्ती*
• ध्वनिक्षेपकाचा आवाज ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियम, 2017 च्या मर्यादेत ठेवावा.
• कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची आयोजकांनी काळजी घ्यावी.
• कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक गटाच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
• ध्वनीक्षेपकाचा आवाज 45 डेसिबलपेक्षा जास्त नसावा.
• महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) मधील तरतुदींचे पालन करावे.
• ध्वनीक्षेपनाबाबत तक्रारी आल्यास परवानगी कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केली जाईल.
• जिल्हादंडाधिकारी नंदुरबार यांना परवानगी रद्द किंवा बदलण्याचा अधिकार राहील.
• ही सवलत 15 दिवसांपेक्षा जास्त मिळणार नाही आणि शांतता क्षेत्रात लागू होणार नाही.
*प्रशासनाचे आवाहन*
नियमांचे पालन करा, जबाबदारीने सण साजरे करा. नियमभंग केल्यास कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी स्पष्ट केले आहे.