नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेचे कलाशिक्षक आनंदराव पवार यांना राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघ च्या वतीने दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाली. सदरील अधिवेशनात नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेचे कलाशिक्षक आनंदराव पवार यांना कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल माजी शिक्षक आमदार तथा स्वागत अध्यक्ष दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आनंदराव पवार यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन मा. आमदार मा.चंद्रकांत रघुवंशी, उप चेअरमन बाळासाहेब मनोज रघुवंशी, संस्थेचे सरचिटणीस यशवंत नाना पाटील, संस्थेचे सदस्य तथा युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष राम भैय्या रघुवंशी संस्थेचे कामकाज पाहणारे प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, जिल्हाध्यक्ष अश्विन पाटील,माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील, उपशिक्षक विजय पवार, दीपक वळवी , रामानंद बागले, हारून खा शिकलीगर, संजय बोरसे, संदीप गायकवाड, श्रीमती संगीता गोखले, लिपिक नेहा शर्मा, शिपाई संजय वसावे, दिनेश पवार, समीर वसावे यादींनी अभिनंदन केले.