Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्य शुटींगबॉल स्पर्धेचे नंदुरबारात उद्घाटन, राज्यभरातून ४५ संघाचा सहभाग

team by team
February 3, 2025
in राज्य
0
राज्य शुटींगबॉल स्पर्धेचे नंदुरबारात उद्घाटन, राज्यभरातून ४५ संघाचा सहभाग

नंदुरबार l प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य शुटींगबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने व नंदुरबार जिल्हा शुटींगबॉल असोसिएशन यांच्यावतीने आयोजित स्व.प्रेमदास कालू यांच्या स्मरणार्थ ३८ वी महाराष्ट्र राज्य शूटिंगबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा २०२४-२५ चे सबज्युनियर व जुनिअर मुले मुली १७ व १९ वर्ष वयोगट या स्पर्धांचे आयोजन एस.ए.मिशन हायस्कूलच्या क्रीडांगणावर करण्यात आले असून सदर स्पर्धेचे उद्घाटन शुटींगबॉलचे माजी खेळाडू तथा पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.सुहास नटावदकर यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य शुटींगबॉल असोसिएशनचे सचिव के.आर.ठाकरे, एस.ए.मिशन ट्रस्टचे सचिव डॉ.राजेश वळवी, एस.ए.मिशन हायस्कूलच्या प्राचार्या नुतनवर्षा वळवी, टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, एस.ए.मिशन ट्रस्टचे उपाध्यक्ष हर्षानंद कालू, संचालक डॉ.राजेश वसावे, नंदुरबार जिल्हा संघटनेचे अध्यक्ष मिनलकुमार वळवी, सचिव डॉ.मयुर ठाकरे, छत्रपती पुरस्कार प्राप्त शुटींगबॉल खेळाडू अशोक चौधरी, क्रीडाशिक्षक भागुराव जाधव, अनिल रौंदळ, जगदीश वंजारी, भरत चौधरी, आशिष कडोसे आदी उपस्थित होते.

स्पर्धेत राज्यभरातून ४५ संघ नंदुरबार शहरात दाखल झाले आहेत. या संघातून महाराष्ट्र राज्याचा सब ज्युनिअर व जुनिअर गटाचा संघ निवडला जाणार आहे. यावेळी बोलताना डॉ.सुहास नटावदकर यांनी खेळातून मिळालेल्या संधीचं मुलांनी सोनं करायला हवं. शालेय जीवनात खेळामुळे शिस्त अंगीकारते. मिशन ट्रस्टने राज्यस्तरावरील स्पर्धेतून नंदुरबार जिल्ह्यात खेळाडूंना संधी उपलब्ध करून दिली. आज झालेल्या सामन्यांमध्ये सब ज्युनिअर गटात संभाजीनगर, अहमदनगर, सोलापूर, अमरावती, धुळे, परभणी, जळगाव हे संघ उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत. स्पर्धा यशस्वीतेसाठी सतीश सदाराव, आकाश बोडरे, मनीष सनेर, तेजस्विनी चौधरी, रुपेश महाजन, मनीष पाटील, संतोष मराठे, राजेश्वर चौधरी, प्रा.जितेंद्र माळी आदींनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

प्रयागराज येथील महा कुंभार हायटेक सुरक्षा उपाय

Next Post

सात कलमी कृती कार्यक्रमाने नागरिकांचे जीवन : सुलभ आणि प्रशासन अधिक गतिशील बनेल : पालक सचिव बी. वेणूगोपाल रेड्डी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add