नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी गावातून बिबट्याची कातडी जप्त करण्यात आली असून याप्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की, वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भगदरी येथील रहिवासी रणजित करमसिंग पाडवी याच्या घरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली असता बिबट्याची कातडी मिळून आली. वनविभागाने बिबट्याची कातडी जप्त केली. याप्रकरणी सहा संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते.
त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर त कारवाई काठी वनपरिक्षेत्र अ अधिकारी प्रविण निळे, से अक्कलकुवा आरएफओ ललित गवळी, तळोदा आरएफओ गिरडकर, मोलगी येथील आरएफओ पाटील, नंदरबार फिरते पथकाचे आरएफओ नितीन वाघ यांच्या पथकाने केली. बिबट्याची कातडी आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.