नंदुरबार l प्रतिनिधी-
महिलेच्या विनयभंग प्रकरणी शिंदेचे नवनिर्वाचित आमदार आमश्या पाडवी यांच्या विरोधात आज निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.आमदार आमश्या पाडवी यांच्या विरोधात आदिवासी समाज आक्रमक झाला असून मोलगी गावातून भव्य निषेध मोर्चा निघणार आहे. तर आमदार आमश्या पाडवी यांच्या समर्थनार्थ अक्कलकुवा खापर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
अक्कलकुव्यातील सोरापाडा येथे दोन दिवसांपूर्वी दोन गटात वाद झाला होता या वादात शिवसेना शिंदे गटाचे नवनियुक्त आमदार आमश्या पाडवी यांच्यावर महिलेचा विनयभंग शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोपावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ग्रामपंचायत निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत पाडवी यांच्या विरोधात काम केल्याचा रागातून परिवारातील सदस्य आणि महिलेला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला असून महिलेला मारहाण झाल्या प्रकरणी आता आदिवासी समाज चांगलाच आक्रमक झाला असून
आमदार आमश्या पाडवी यांच्या विरोधात अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी या गावात निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे..आमदार पाडवी यांचा मुलगा जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी, मुलगी सोरापाडा सरपंच अंजू पाडवी, यांच्यासह कार्यकर्ते यांच्यावर अक्कलकुवा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दरम्यान शिंदे शिवसेनेचे आमदार आमश्या पाडवी यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केल्याच्या आरोप करत. त्यांच्या समर्थनार्थ अक्कलकुवा तसेच खापर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.