नंदुरबार l प्रतिनिधी-
शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा लोय तालुका जिल्हा नंदुरबार येथे भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा 2024 चे यशस्वी आयोजन करण्यात आले.
सदर परीक्षेकामी प्रा. श्रीम. वसावे, श्रीम. मावची , प्रा. प्रकाश वसावे व तानाजी वसावे यांनी पर्यवेक्षक , भूगोल विषय शिक्षक भारत चौधरी व परीक्षेचे समन्वयक प्राध्यापिका श्रीम. यू. के. राजपूत यांनी काम पाहिले. परीक्षेचे आयोजन शाळेचे प्राचार्य ए. बी.भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदर परीक्षेत इयत्ता आठवी ते बारावीच्या 167 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला परीक्षेच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.