नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील का वि प्र संस्था भालेर संचलित श्रीमती क.पू .पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन का.वि.प्र.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, ग्रामपंचायत सदस्या, प्राध्यापिका सौ.कविता पाटील, प्राचार्या सौ. विद्या चव्हाण, व सर्व कर्मचारी वृंद यांनी प्रतिमेची पूजन केले.
विद्यार्थ्यांना संविधान दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. भारतीय संविधान हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे लोकशाही ,समता ,स्वातंत्र्य आणि न्यायाची प्रतीक असलेल्या या संविधानाचा अभिमान बाळगू या आपल्या कर्तव्याचा आदर करूया. सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी कर्मचारी वृंद यांनी संविधान उद्देशिकाचे वाचन केले. विद्यार्थ्यांनी संविधानावर भाषण व कविता सादर केल्या.
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना डिजिटल क्लासरूमला संविधानाविषयी माहिती कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचारी वृंद यांनी दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी २६/११ ला मुंबई येथील ताज हॉटेल वरील भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस, अधिकारी व जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
पर्यवेक्षक, प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षक -शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले सूत्रसंचालन व्हि.व्हि. इशी यांनी केले.