नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील कुकावल कोठली येथे अखंड हरीनाम संकीर्तन समाप्ती प्रसंगी महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार किरण तडवी टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोष करीत फुगळी खेळत भक्ती रसात दंग झाल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या तीन दिवसांपासून नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार किरण तडवी यांच्या प्रचार दौरा सुरू आहे. प्रचारादरम्यान,कुकावल कोठली येथे हरिनाम सप्ताहात त्यांनी हजेरी लावली. सप्ताहाच्या समारोप काल्याचे किर्तनाने दहीहंडी फोडण्यात आले. त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार किरण तडवी टाळ मृदंगाच्या गजरात हरिनामाच्या जयघोष करीत फुगळी खेळत भक्ती रसात दंग झाल्याचे पाहायला मिळाले.
बुधवारी तापी पट्ट्यातील कळंबू, कुकावल कोठली,पिंगाणे,मातकुट, बिराळे, धांद्रे,भादा, धुरखेडा,बिलाडी,बामखेडा आदी गावांमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली. प्रचार फेरीमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल,माजी सभापती अभिजीत पाटील, माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी, समीधा नटावदकर यांच्यासह पंचक्रोशीतील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झालेले होते.