नंदुरबार l प्रतिनिधी
महाविकास आघाडी तथा काँग्रेसचे उमेदवार उमेदवार किरण तडवी यांनी कॉर्नर सभांच्या सपाटा लावलेला आहे. कॉर्नर सभांच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आवाहन ते करीत आहेत.
नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये प्रचार फेरी काढल्यानंतर सायंकाळी सभांचे आयोजन करण्यात येत आहे. कॉर्नर सभेच्या माध्यमातून काँग्रेसच्या जाहीरनामा जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. सर्वच सभांना चांगला प्रतिसाद मिळत असून, काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, जि.प माजी सभापती अभिजीत पाटील, माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी, उमेदवार किरण तडवी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. सभेत जयपालसिंह म्हणाले, गेल्या 30 वर्षांपासून मतदार संघाच्या विकास झालेला नाहीये. अनेक आदिवासी वाड्यापाड्या मधील लाभार्थ्यांना योजनांपासून वंचित राहावं लागत आहे.
यावेळी अभिजीत पाटील यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली. विद्यमान मंत्र्यांनी तीस वर्षांपासून मतदार संघाला विकासापासून वंचित ठेवलेल आहे. विकास फक्त ठेकेदारांच्या झालेला आहे जनतेचे झालेला नाहीये. येत्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रसंगी माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी,समिधा नटावदकर यांनी मार्गदर्शन केले.
उमेदवार किरण तडवी थिरकले
मतदार संघातील काकरदा येथे उमेदवार किरण तडवी यांचे हळगी वाजवून स्वागत करण्यात आले. काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी किरण तडवी यांना खांद्यावर घेत नृत्य केले यावेळी तेही थिरकले.