नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार येथील छायाचित्रकार नितीन पाटील यांना फोटोग्राफी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार देऊन विविध मान्यवरांच्या हस्ते साक्री तालुक्यातील झिरणीपाडा माय महोत्सव मध्ये सन्मानित करण्यात आले.
साक्री तालुक्यातील झिरणीपाडा येथील ‘माय महोत्सव’ निमित्त कै.मालतीबाई नामदेव पवार यांच्या स्मरणार्थ फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नंदुरबार येथील छायाचित्रकार नितीन पाटील यांना पुरस्कार वितरण झिरणीपाडा येथे माय महोत्सव कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण कल्याण येथील लोककवी प्रा. प्रशांत मोरे, नगर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दशरथ खोसे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी आयोजक प्रवीण पवार, विजय पाटील यांच्यासह साहित्यिक , कवी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात कवी संमेलन, पुरस्कार वितरण, विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.
छायाचित्रकार नितीन पाटील यांना यापूर्वी फोटोग्राफी स्पर्धेत विविध पारितोषिक मिळाले आहेत. फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल विविध ठिकाणी पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी विविध विषयांवरील फोटोंचे प्रदर्शन नंदुरबार, जळगाव, नाशिक मुंबई येथे भरविले आहे.
श्री पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे फोटोग्राफर संघटना, पत्रकार संघटना यासह विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.