नंदुरबार l प्रतिनिधी
समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे वार्षिक अधिवेशन प्रकाशा येथील अन्नपूर्णा माता मंदिर या ठिकाणी समस्त लेवा पाटीदार गुजर समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या अधिवेशनात समाजहिताचे विविध ठराव मंजूर करण्यात आले.
सर्वप्रथम माँ अन्नपूर्णा, स्व. अण्णासाहेब पी.के.पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी अधिवेशनात समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई पुरुषोत्तम पाटील, महीला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील, सौ. जयश्रीबेन उर्फ कांचनबेन पाटील, सौ. माधवीताई पाटील, उपाध्यक्ष सुनील पटेल, ईश्वर पाटील, जगदीश पाटील, रविंद्र गुजर, दिलीप पटेल, सुनील पाटील, महेंद्रभाई पाटील, दीपकनाथ पाटील, डॉ. सतीश चौधरी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. समाजातील मृत झालेल्या समाजबांधव तसेच देशपातळीवर थोर दिवंगत व्यक्ती यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी समाजाचे जनरल सेक्रेटरी सुनील पाटील यांनी मागील सभेचे प्रोसिडिंग वाचन केले व जमा झालेल्या खर्चाचे वाचन केले.
.
यावेळी डॉ. वसंतभाई चौधरी (करजकुपा), जगदीशभाई पटेल (निझर), गणेशभाई पाटील (पाडळदा), सुदामभाई पाटील (कोळदा), डॉ प्रफुल्ल पाटील (शिवपूर), डॉ सविताबेन पटेल (नंदुरबार), रविंद्र पाटील (शिंदे) आदींनी मनोगत व्यक्त केले. सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक असून सर्वानी मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून, आपल्या मतदानाचा हक्क बजावताना तो आपण विचारपूर्वक निर्णय घेऊन करायला पाहिजे. मतदान करणे हे प्रत्येक व्यक्तीचे हक्क आणि कर्तव्य आहे व त्यासोबत राष्ट्र उभारणीचे ही काम आहे. मतदान करणे हे आवश्यक असून प्रत्येक नागरिकाने मतदान केलेच पाहिजे आणि आपला हक्क बजावला पाहिजे.
नंदुरबार येथील जगन्नाथभाई भाऊभाई चौधरी यांचे लिखित “भाई राम – राम” या पुस्तकाचे प्रकाशन समाजाचे अध्यक्ष दीपकभाई पाटील, महीला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती कमलताई पाटील व उपस्थित मान्यवराच्या हस्ते करण्यात आला व त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात यश व प्राविण्य संपादन केलेल्या समाजातील युवक युवती व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यात डॉ. काजल शरद पाटील, टाकरखेडा ह.मु.मलोणी (विद्यापीठ गुणवत्ता यादीत समावेश, गोल्ड मेडल प्राप्त – बॅचलर ऑफ फिजियोथेरपी), डॉ. हिमांशू भाईदास पाटील, पाडळदा, ह.मु.विद्याविहार (पीएचडी – कबचौउमवि, जळगाव) डॉ. परेश अशोक पाटील, गुजर गल्ली, शहादा (पीएचडी – आरकेडीएफ विद्यापीठ, भोपाळ) कु. चांदणी भानुदास पाटील, बामखेडा (राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा निवड ) कु. राजविर युवराज पाटील, मलोणी (17 वर्षाखालील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड), पियुष विलास पाटील, सारंगखेडा ह.मु.शहादा (कॅट परीक्षेत उत्तीर्ण होऊन आयआयएम बंगलोर येथे प्रवेश), चैतन्य उमाकांत पाटील, शिरूड, ह.मु.सोनगड (गेट परीक्षेत उत्तीर्ण होऊन आयआयटी कानपुर येथे एम. टेक प्रवेश) तेजस नरेंद्र चौधरी, बामखेडा, ह.मु.नवसारी (नॅशनल टॅलेंट सर्च परीक्षेत उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्ती मिळवली, सध्या आयआयटी, मुंबई येथे कॉम्प्युटर सायन्स शाखेत शिक्षण घेत आहे), आनंदकुमार बुद्धर पाटील, करजकुपा (“उफक” लघुपट लेखन व दिग्दर्शन, एम्प्टी स्पेस इंटरनेशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवल साठी प्रदर्शनासाठी निवड), नितीन रतिलाल पाटील, बामखेडा, हल्ली मुक्काम पुणे (“सूर्या एक प्रेरणादायी प्रवास” या चित्रपटासाठी वर्ल्ड फिल्म फेस्टिवल कॅन्स महोत्सवात “उत्कृष्ट अभिनय पदार्पण पुरस्कार”), ह्रिदय योगेश पाटील, मलोणी, ह.मु. पुणे (स्केटिंग खेळात नेशनल आणि इंटरनेशनल निवड तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड वेब रेकॉर्ड, आयकॉन आंबेसोडोर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड), अरविंद सुदाम पाटील, पुसनद, (वैशिष्ट्यपूर्ण कार्य), श्रीराम छगन पाटील, पद्मावती मंडप तिखोरा (वैशिष्ट्यपूर्ण कार्य) यांचा समाजाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, महीला आघाडीच्या अध्यक्षा ताईसाहेब श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई पाटील यांनी सांगितले की, समाजबांधवानी संघटित राहावे यासाठी प्रयत्न करावेत तसेच समाज कसा पुढे जाईल यासाठी प्रयत्न करावेत. समाजात समानता ठेवले पाहिजे, समानता ठेवली तर सगळ्यांचे कल्याण होईल. स्व. अण्णासाहेबांनी सर्वांना सोबत घेऊन समाज कार्य करावे असे सांगितले होते. गुजर समाज हा शेतीप्रधान समाज आहे. समाजातील संघटन बळकट करून शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी मुली द्याव्यात. समाजातील तरुण मुला-मुलींनी आधुनिक युगात विविध क्षेत्रात कार्य करावे. समाजाने केलेले नियम हे सर्वांनी काटेकोरपणे पाळले पाहिजे. समाजहितासाठी राजकारण न करता कोण कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा समाजाच्या सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. प्रत्येकाने जगले पाहिजे आणि हित जोपासले पाहिजे. आपल्या समाजाच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे या भारत सरकार मध्ये उच्चपदावर विराजमान असून ते आपल्या समाजासाठी अभिमानाची बाब आह त्याअनुषंगाने समाजातर्फे त्यांचा सत्काराचा ठराव पारित करण्यात आला.
या अधिवेशनात सुनिल पटेल, जगदीश पाटील, राकेश पाटील, शितल पटेल, मोहन चौधरी, सुनील पाटील, दीपकनाथ पाटील, जगदीश पटेल, हरी दत्तू पाटील, रामचंद्र दशरथ पाटील, डॉ सतीश चौधरी, मोहन पटेल, रविंद्र गुजर, सुभाष पटेल, शिवदास चौधरी, दिलीप पाटील, रमाकांतभाई पाटील, किशोर पटेल, मंगलाबेन चौधरी, डॉ सविता पटेल, मयूर पाटील, विजय पाटील, दिलीप ज्ञानदेव पाटील, जयप्रकाश पाटील, के. डी. पाटील, प्राचार्य डॉ.पी.एल. पटेल, यशवंत पाटील, भरत पाटील, डॉ प्रफुल्ल पाटील, घनश्याम चौधरी, आदी उपस्थित होते. या वार्षिक अधिवेशनात आलेल्या सर्व समाजबांधवांसाठी जेवणाची व्यवस्था पुसनद ता.शहादा येथील अरविंदभाई सुदाम पाटील यांच्याकडून करण्यात आली होती तर मंडपाची व्यवस्था पद्मावती मंडपचे श्रीरामभाई पाटील यांच्याकडून करण्यात आली होती. तर पुढील वर्षासाठी जेवणाची व्यवस्था प्रकाशा येथील तुंबाभाई मगन पाटील यांच्यातर्फे करण्यात येणार आहे. यावेळी समाजाच्या वार्षिक अधिवेशनात मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. अधिवेशनाचा समारोप राष्ट्रगीताने झाला. सुनील पाटील यांनी अधिवेशनाचे सूत्रसंचालन व आभार मानले.