नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार शहरातील प्रभाग क्रमांक एक आणि पाच मधील विविध वसाहतींमध्ये नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांची जोरदार प्रचार फेरी पार पडली. लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने घेतलेला सहभाग, डॉक्टर गावित यांच्या कार्यावर आधारलेले अहिराणी आणि आदिवासी भाषेतील वाजणारे वाहनांवरील गाणे विशेषतः लक्षवेधी ठरले.
भाजपा महायुतीचे उमेदवार मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार शहरात देखील आपल्या झंजावाती प्रचार फेऱ्यांना सुरूवात केली आहे. मतदारांशी संपर्क साधण्यासाठी प्रचार फेरी काढली असता प्रत्येक कॉलनीत त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होताना दिसले. जागोजागी लाडक्या बहिणीच्या सहभागामुळे त्यांची रॅली फुललेली दिसली. हातात ध्वज आणि डोक्यावर टोप्या लावून फिरणाऱ्या महिला, उत्स्फूर्त घोषणा देणारे युवक त्याचबरोबर त्या त्या भागातील मान्यवरांचा मोठा सहभाग रॅलीचा आकर्षण बिंदू ठरला.
राजकारण, समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे त्याचप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याच्या विकासात पाच-दहा वर्षाचे नव्हे तर तीस वर्षाचे भरीव योगदान देणारे नेतृत्व मतदारांनी लक्षात घ्यावे. राजकारणात आणि समाजकारणात कोणतेही योगदान नसलेल्या तसेच गटारी रस्ते आणि तत्सम कामांच्या भ्रष्टाचारात बुडालेल्या उमेदवाराला नको तर विकास कार्याचा इतिहास रचणाऱ्या भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांना मतदान करा, असे आवाहन याप्रसंगी रॅलीत सहभागी झालेल्या मान्यवरांनी समस्त मतदारांना केले.
नंदुरबार शहरातील प्रभाग क्रमांक 1 आणि 5 मध्ये बाबा गरीब दास चौक, नवी सिंधी कॉलनी, जुनी सिंधी कॉलनी, शिक्षक कॉलनी, मोठा भाऊ नगर, गुरुनानक कॉलनी, जयहिंद कॉलनी, नागाई नगर, ईश्वर कॉलनी, ठाकूरसिंग बाबा नगर, सरोज नगर, बेथल कॉलनी, ग्रीन पार्क , राजेंद्र नगर , शाहूनगर, एकता नगर, खंडेराव पार्क, हरिओम नगर, एम एल टाऊन, दशरथ नगरी, वृंदावन नगर, चित्ते नगर, रूपा सेठ नगर अशा विविध भागातून त्यांनी संवाद साधला.
त्यांच्या समवेत भाजपाचे तालुका अध्यक्ष जे. ए. पाटील, डॉक्टर विक्रांत मोरे, माजी गटनेते चारूदत्त कळवळणकर, जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश छगन चौधरी, ईश्वर धामणे, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त युवराज पाटील, माजी उपनगराध्यक्ष श्याम मराठे, मोहन खानवाणी, आनंदा माळी, संतोष भाऊ वसईकर, रिपब्लिकन पार्टीचे सुभाष पान पाटील, विनोद वानखेडे, सिंधी समाजातील अनेक मान्यवर तसेच जगदीश पाटील, संजू भाई शहा, जितेंद्र मराठे, योगेश पाटील, सरिता चौधरी, दिव्या जोशी, रत्ना चौधरी, सुरेखा पाटील, अर्जुन मराठे, निलेश चौधरी व अन्य कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक सहभागी होते.