नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यात आज कोरोनाचे दोन रूग्ण उपचाराअंती बरे झाल्याने त्यांना रूग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान दोघे कोरोनामुक्त झाल्याने नंदुरबार जिल्हा तुर्त कोरोनामुक्त झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात काही दिवसांपासून नंदुरबार, नवापूर, तळोदा व शहादा तालुक्यात कोरोना रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी आज दि.१३ ऑक्टोबर रोजी नंदुरबार तालुक्यातील एक व तळोदा तालुक्यातील एक रूग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. सध्या घडीला नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नसल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. नंदुरबार जिल्हा तुर्त कोरोनामुक्त झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३७ हजार ५०० कोरोना रूग्ण आढळून आले आहे. पैकी ३६ हजार ५९८ जण कोरोनामुक्त झाला आहे. तर ९५१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नंदुरबार जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १५.६९, मृत्यूदर २.३७ बरे होण्याचे प्रमाण ९७.६३ इतके आहे.








