Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मतदानाच्या दोन दिवस आधीपासून मतदानाच्या दिवसापर्यंत तसेच, मतमोजणीच्या दिवशी मद्य विक्री बंद राहणार, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

team by team
October 26, 2024
in राज्य
0
तापी नदीकाठावरील नागरिक व गावांनी सतर्कतेता बाळगावी : डॉ. मित्ताली सेठी

नंदुरबार l प्रतिनिधी-
विधानसभा निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक असलेल्या मतदारसंघाच्या हद्दीतील मद्यविक्री १८ ते २० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आणि मतमोजणीच्या दिवशी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत, याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले आहेत.

 

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार नंदुरबार जिल्ह्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार असून मतमोजणी २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. लोकप्रतिनिधत्व अधिनियम, 1951 कलम 135 (सी) अन्वये तसेच महाराष्ट्र देशी दारू नियम, महाराष्ट्र विदेशी मद्य नियम (रोखीने विक्री, विक्री रजिस्टर इ.), महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि ताडीची झाडे नियम, विशेष परवाने आणि अनुज्ञप्ती नियम, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देत आहे.

 

 

बंदची तारीख, दिवस आणि वेळ या क्रमाने
१८ नोव्हेंबर २०२४ ला (मतदान संपण्यापूर्वी ४८ तास अगोदर) सायंकाळी ६ वाजेपासून. १९ नोव्हेंबर २०२४, (मतदानाच्या पूर्वीचा संपूर्ण दिवस), २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानाचा संपूर्ण दिवस मतदान संपेपर्यंत. मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण दिवस म्हणजे २३ नोव्हेंबर २०२४, रोजी मद्य विक्रीची दुकाने बंद राहतील.

 

 

संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी याची नोंद घ्यावी. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाची अंमलबजावाणी करण्यास कुचराई करतील त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ५४ व ५६ नुसार कडक कारवाई करण्यात येईल व ते धारण करत असलेला परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आदेशात नमूद केले आहे.

 

बातमी शेअर करा
Previous Post

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा, जिल्हास्तर परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीची बैठक

Next Post

आता मतदार भूलथापांना बळी पडणार नाहीत, डॉक्टर गावित यांनी व्यक्त केला विश्वास

Next Post
आता मतदार भूलथापांना बळी पडणार नाहीत, डॉक्टर गावित यांनी व्यक्त केला विश्वास

आता मतदार भूलथापांना बळी पडणार नाहीत, डॉक्टर गावित यांनी व्यक्त केला विश्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

शिवसेना युवा सेनेतर्फे श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

February 20, 2026
सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

सैनिकी विद्यालयात शिवजयंती साजरी

February 20, 2026
शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

शिवजयंतीनिमित्त एस. ए. मिशन विद्यालयात सांस्कृतिक,शैक्षणिक कार्यक्रमांची मेजवानी

February 20, 2026
नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदा सार्वत्रिक निवडणूक-२०२५; निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर

87 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

February 20, 2026
अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी 28 फेब्रूवारी पर्यंत माहिती सादर करावी

February 20, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना घेतला ‘तोरणमाळ महोत्सव’ पूर्व तयारीचा आढावा

February 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add