नंदुरबार l प्रतिनिधी-
आदिवासी विकास विभागामार्फत केंद्र सरकारकडील सन 2011-2012 या आर्थिक वर्षांकरीता विशेष साहाय्य योजनेंतर्गत नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या युवकांना वॉर्ड बॉय प्रशिक्षण देण्यासाठी 22 ऑक्टोंबर 2021 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
वॉर्ड बॉय प्रशिक्षणासाठी उमेदवार अनुसूचित जमातीचा असावा. उमेदवाराकडे दारिद्र्य रेषेखालील दाखला असावा. प्रशिक्षणासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक राहील, अर्जासोबत रहिवाशी दाखला, आधार कार्ड, उत्पन्न दाखला असणे आवश्यक राहील.
अधिक माहिती व अर्जासाठी (सुटीचे दिवस वगळून ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नवापूर रोड, नंदुरबार येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.








