Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारासोबत, पाच व्यक्ती व ताफ्यात तीनच वाहने असावीत : जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

team by team
October 19, 2024
in राजकीय
0
नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारासोबत, पाच व्यक्ती व ताफ्यात तीनच वाहने असावीत : जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करताना येणाऱ्या उमेदवारांसोबत पाच व्यक्ती तसेच उमेदवारांच्या वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहनांचा समावेश नसावा, अशा आशयाचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा डॉ. मित्ताली सेठी यांनी काढले आहेत.

 

 

जिल्हाधिकारी श्रीमती सेठी यांनी म्हटले आहे की, भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी कार्यक्रम घोषित केला आहे. त्या दिवसापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून वरील आदेश देण्यात आले आहेत. तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात पाच व्यक्ती उपस्थित राहतील. या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.

 

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करताना कार्यालयाच्या परिसरात मिरवणुका, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे, कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. त्यानुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार सदरचे आदेश देण्यात आले आहेत. सदरचे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच २५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत अंमलात राहतील. या आदेशाचा भंग केल्यास भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हादंडाधिकारी श्रीमती सेठी यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कॉपर केबल चोरी करणारे संशयित स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात, असून दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

Next Post

चिनी फटाके तसेच देवी-देवता आणि राष्ट्र पुरुषांची चित्रे असलेली फटाके विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा : हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

Next Post
चिनी फटाके तसेच देवी-देवता आणि राष्ट्र पुरुषांची चित्रे असलेली फटाके विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा : हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

चिनी फटाके तसेच देवी-देवता आणि राष्ट्र पुरुषांची चित्रे असलेली फटाके विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करा : हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add