Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नांना यश; कृषी योजनेच्या आर्थिक निकष वाढीला मिळाली मान्यता,आदिवासी आणि नवबौद्ध शेतकऱ्यांना मिळतील हे लाभ

team by team
October 15, 2024
in राजकीय
0
मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नांना यश; कृषी योजनेच्या आर्थिक निकष वाढीला मिळाली मान्यता,आदिवासी आणि नवबौद्ध शेतकऱ्यांना मिळतील हे लाभ

नंदुरबार l प्रतिनिधी-

आदिवासींचा शेती विकास व्हावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये सुधारणा करण्यास व योजनेमध्ये नवीन घटक समाविष्ट करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटक समाविष्ट करण्याबाबत देखील शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती देताना आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की, राज्यातील अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी संदर्भाधीन दि.९ ऑगस्ट, २०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये आदिवासी उपयोजना सुधारित करण्यात आली आहे. सन 2017 नंतर प्रथमच योजनेचे आर्थिक मापदंड वाढविण्यात आलेत आणि त्या अनुषंगाने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतील घटकनिहाय सुधारणा मंजूर करण्यात आलेल्या आहेत.

त्यानुषंगाने या योजनेचे घटकनिहाय आर्थिक मापदंड वाढविणे, निकषांमध्ये सुधारणा करणे व नवीन घटकांचा समावेश करण्यास दि.५ सप्टेंबर, २०२४ रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात आली व शासन निर्णय निर्गमित करण्यात आले.

या शासनादेशात म्हटलेल्या नुसार

नवीन विहिरीचे पॅकेज नवीन विहिरीसह वरील सर्व बाबी घेतल्यास मिळणारे अधिकतम एकुण अनुदान रु. 6,92,000/-

• जुनी विहिरीचे पॅकेज – जुनी विहिर दुरुस्तीसह इतर सर्व बाबी घेतल्यास मिळणारे अधिकतम एकुण अनुदान रु. 3,92,000/-

• शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण पॅकेज असलेल्या शेततळ्यात प्लॅस्टिक अस्तरीकरणासह इतर सर्व बाबी घेतल्यास मिळणारे अधिकतम एकुण अनुदान रु. 4,52,000/-
असे राहील.

याच बरोबर अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटक समाविष्ट करण्याबाबत देखील शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेच्या आर्थिक निकषांमध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यास व योजनेमध्ये नवीन घटक समाविष्ट करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

• नवीन विहिरीचे पॅकेज- नवीन विहिरीसह वरील सर्व बाबी घेतल्यास मिळणारे अधिकतम एकुण अनुदान रु. 6,92,000/-
जुनी विहिरीचे पॅकेज- जुनी विहिर दुरुस्तीसह इतर सर्व बाबी घेतल्यास मिळणारे अधिकतम एकुण अनुदान रु. 3,92,000/-
• शेततळ्याचे प्लॅस्टिक अस्तरीकरण पॅकेज असलेल्या शेततळ्यात प्लॅस्टिक अस्तरीकरणासह इतर सर्व बाबी घेतल्यास मिळणारे अधिकतम एकुण अनुदान रु. 4,52,000/-

बातमी शेअर करा
Previous Post

बिग ब्रेकिंग : राज्यातील विधानसभेच्या निवडणुका आज होणार घोषित, पत्रकार परिषदेचे आयोजन

Next Post

मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांनी अतिदुर्गम पाड्यांच्या विद्युतीकरणासाठी दिला 400 कोटी रुपयांचा निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add