Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तालुका क्रीडा संकुल बांधकामासाठी 26 कोटी 47 रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकाला मिळाली मान्यता; मंत्री डॉ.गावित यांच्या प्रयत्नांना यश

team by team
October 12, 2024
in राजकीय
0
लाडकी बहीण योजनेप्रमाणेच गावागावातील वयोवृद्धांना देणार वयोश्री आणि तीर्थ दर्शन योजनेचा लाभ; 29 रोजी नोंदणी शिबिराला उपस्थित रहा : मंत्री डॉ.विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी-

आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नामुळे नंदुरबार जिल्ह्यातील पहिले भव्य प्रशस्त क्रीडा संकुल उभारणीच्या कामाला सुरुवात झाली असून या संकुलात उभारल्या जाणाऱ्या 70 व्यापारी गाळ्यां च्या बांधकामासह 26 कोटी 47 लक्ष रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

गेल्या अनेक वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या तालुका क्रिडा संकुलाच्या कामाचे भूमीपूजन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते कालच पार पडले. नंदुरबार तालुका क्रिडा संकुलासाठी शासन धोरणाप्रमाणे पाच कोटी तर व्यापारी संकुलासाठी 20 कोटी 17 लाख 23 हजारांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती. तथापि संकुल समितीने रु.१४२३.७८ लक्षचे अंदाजपत्रक सादर केलेले आहे.

त्यामध्ये ७० व्यापारी गाळे व इतर खर्च समावेश आहे. यापुर्वी सादर केलेले व्यापारी गाळे ढोबळ अंदाजपत्रक रु. ७९३.०७ लक्ष मान्यता रद्द करुन रु.१४२३.७८ लक्ष अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. सदर क्रीडा संकुलाचे रु.२०१७.२३ वाढीव बाबीं पैकी रु.७९३.०७ लक्ष मान्यता रद्द करुन शिल्लक रु.१२२४.१६ लक्ष आणि सुधारीत अंदाजपत्रक रू. १४२३.७८ लक्ष असे एकूण रु.२६४७.९४ लक्ष अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे. प्रथम टप्प्यातील रु.५००.०० लक्ष अंदाजपत्रकामध्ये सुरक्षा रक्षक कॅबीन, संरक्षण भिंत व मेन गेट, मुलां- मुलीकरीता स्वच्छता गृह, रेन वॉटर हार्वेस्टींग, सोलर रुफ, वॉटर सप्लाय, विद्युतीकरण, अंतर्गत रस्ते, विविध खेळाचे मैदाने, कबड्डी, खो-खो, बास्केटबॉल इ.मैदाने, सी.सी.टी.व्ही., व इ. खर्च समावेश आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

40 कोटी रुपये खर्चाच्या आदिवासी सांस्कृतिक संकुल बांधकामाला मिळाली प्रशासकीय मान्यता

Next Post

ज्योत्सना गावित यांची भारतीय जनता पार्टी युवती जिल्हाध्यक्षपदी निवड

Next Post
ज्योत्सना गावित यांची भारतीय जनता पार्टी युवती जिल्हाध्यक्षपदी निवड

ज्योत्सना गावित यांची भारतीय जनता पार्टी युवती जिल्हाध्यक्षपदी निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026
माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका

May 21, 2026
भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

भालेर येथे भव्य महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

May 21, 2026
20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

20 मे रोजी औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता

May 19, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add