नंदुरबार l प्रतिनिधी
दसरा मेळाव्यासाठी नंदुरबारातून शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
दसऱ्या निमित्त शिवसेनेच्या शिंदे गटाचा मिळाव्यासाठी नंदुरबारातून असंख्य कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले. जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी शिवसैनिकांच्या वाहनांना झेंडी दाखवली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की, जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्या.
मुंबईतील आझाद मैदानावर दसऱ्यानिमित्त आज शनिवारी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मेळाव्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारलेला आहे.
जीटीपी महाविद्यालयाच्या मैदानावरून सायंकाळी जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांनी शिवसैनिकांच्या वाहनांना झेंडी दाखवत मुंबईकडे रवाना केले. यावेळी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विक्रमसिंह वळवी, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.सयाजीराव मोरे,माजी जि.प अध्यक्ष वकील पाटील,माजी पं.स उपसभापती तेजस पवार,माजी पं.स सदस्य सुनील वसावे यांच्यासह नगरसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.