नंदुरबार l प्रतिनिधी
प्रकाशा येथे सर्वसामान्य नागरिकांचा तकरीचे निरसन करण्यासाठी खासदार गोवाल पाडवी यांनी आज सर्व शासकीय यंत्रणेच्या उपस्थितीत जनता दरबार घेतला. व काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
प्रकाशा येथील बालाजी लॉन्स मध्ये सर्व सामान्य नागरिकांचा तक्रारी ऐकून घेण्यासाठी व त्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी खासदार गोवाल पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शासकीय यंत्रणाच्या उपस्थित जनता दरबार घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून
आमदार के.सी.पाडवी, माजी जि.प अध्यक्ष ॲड.सीमा वळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अभिजीत मोतीलाल पाटील,
निवृत्त कार्यकारी अभियंता जेलसिंग पावरा, माजी सभापती डॉ. सुरेश नाईक, युवा अध्यक्ष निलेश पाटील, जि प सदस्य योगेश पावरा, एन डी पाटील, आदी व्यासपीठावर होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या सत्कार समारंभ झाला. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजीत पाटील यांनी केले. उपस्थित सर्व शासकीय यंत्रणेच्या नागरिकांनी ओळख परिचय करून दिला. नंतर तक्रारींच्या पाडा सुरू झाला.
उपस्थित नागरिकांनी विविध विभागांविषयी तक्रारी सुरू केल्यात. त्यात पोलीस प्रशासनावर तक्रांच्या पाढा सुरू झाला. यात नकली ताडीमुळे आदिवासींचे तरुण मुलं दगावत आहे. तेव्हा नकली ताडी व गांजा हा बंद झाला. पाहिजे अशी तक्रार आली, त्यानंतर वीज वितरण कंपनीच्या तक्रारी सुरू झाल्या त्यात वीज तारा चोरीला जाणे, मोटर चोरीला जाणे पंचनामा होऊ नहीं भरपाई न मिळणे,
आदी तक्रारी झाल्या.
त्यानंतर रस्ते विकास महामंडळाच्या अधिकारीला धारेवर धरले. गोमाई नदी पुलावरून अवजड वाहने लवकर सुरू करा कारण शेतकऱ्यांचे ऊस, पपई,मिरची ट्रॅक्टर,ट्रॉली, ट्रक भरून याच्यावरून जाणार आहेत. तेव्हा पुलावर अवजड वाहणे सुरू करा. जर गोमाई नदी पूल शेतकऱ्यांच्या वाहनांसाठी सुरू केला नाही तर आंदोलन केले जाईल व तापी पुलावर खड्डे बुजवण्याच्या सूचना केल्यात.
उज्वला गॅस वाटप करा. या संदर्भात चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली. उज्वला गॅस योजनेत लोकांना सबसिडी येते आहे. त्यांना शेगडी मिळाली आहे. मात्र गॅसची टॅंक अद्याप मिळालेले नाही. अशा तक्रारी त्या ठिकाणी नागरिकांनी केल्या.
त्यानंतर शहादा शहर व तळोदा शहर येथे झालेल्या विकास कामाच्या तक्रारी झाल्या. या दोन्ही शहरातील सौर ऊर्जेचे पथदिवे बंद आहेत, या दोन्ही शहरांमध्ये वाहतुकीच्या समस्या आहे. कचरा घेण्यासाठी घंटागाडी येत नाही.
तसेच नर्मदा पुनर्वसन कडे विकास काम झालेली नाहीत. वैयक्तिक शौचालय साठी अनुदान मिळत नाही.
तसेच जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी रस्त्याचे काम संत गतीने सुरू आहेत काही ठिकाणी रस्त्याचे काम करताना निष्कृष्ट दर्जाचे झाली आहे. तेव्हा संबंधी ठेकेदाराला काळा यादीत टाका अशा तक्रारी झाल्या. हर घर जल योजना जिल्ह्यात बारगडली आहे. तेव्हा सर्व कामांची चौकशी करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
काही ठिकाणी कोरडवाहू शेती आहे सोयाबीन पेरले होते अति पावसामुळे खराब झाले आहे. त्यांना देखील आपल्याकडून तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे, शासनाने घरकुल वाल्यांना सवलतीच्या दरात वाळू उपलब्ध केले आहे मात्र ती मिळत नाही. शिक्षण विभागात युवा कार्य कौशल्या अंतर्गत शिक्षक भरती करताना डीएड, बीएड ऐवजी फार्मसी, कृषी विभागाचे, भरती झाले आहेत. अशाही तक्रारी होत्या.
प्रकाशा भारतीय स्टेट स्टेट बँक मधून लोन देण्यास टाळाटाळ केली जाते.
तसेच रेगुलर ग्राफ लोन भरणाऱ्या शेतकरीला पन्नास हजार चे अनुदान शासनाकडून आहे पण ते. मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करा. अशी तक्रार ग्रामस्थांनी केली.
याप्रसंगी शहादा तहसीलदार दीपक गिरासे, तळोदा तहसीलदार दीपक, उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा दत्ता पवार, शहादा पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे, आदींसह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.