नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली येथे एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे फलक उद्योजक ड्रीम कंट्रक्शन किरण तडवी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
यावेळी फलक अनावरण प्रसंगी संस्थापक अध्यक्ष
राजकुमार जी.सोनवणे,प्रदेश उपाध्यक्ष गुलाब नाईक, महिला प्रदेश अध्यक्ष सौ. दीपाताई वळवी, महिला शहर अध्यक्ष सोनलताई ठाकरे, जिल्हा अध्यक्ष रवींद्र सोनवणे,
जिल्हा उपाध्यक्ष राकेश जाधव, शहरप्रमुख गणेश सोनवणे, नंदुरबार तालुका अध्यक्ष विजय ठाकरे आदी उपस्थित होते. या वेळी मोठ्या उत्साहात फलक अनावरण करण्यात आले.यावेळी संघटनेचे पदाधिकारी, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.








