Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर धुळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

team by team
September 28, 2024
in राजकीय
0
माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर धुळे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

धुळे l प्रतिनिधी

माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर आज धुळे येथील एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गांवडे यांनी प्रशासनाच्यावतीने त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, खासदार डॉ.शोभाताई बच्छाव, खासदार ॲड. गोवाल पाडवी, माजी मंत्री आमदार सर्वश्री. बाळासाहेब थोरात, ॲड. के.सी. पाडवी, जयकुमार रावल, सत्यजित तांबे, हिरामण खोसकर, शिरीष कुमार नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गांवडे, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर, अपर तहसिलदार वैशाली हिंगे, तहसीलदार पंकज पवार, अरुण शेवाळे विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यासह आजी माजी मंत्री, लोकप्रतिनिधी, आप्तेष्ट, नागरिक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार जयकुमार रावल यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रध्दांजलीपर आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. यावेळी पोलीस दलातर्फे त्यांना बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी हवेत झाडून सशस्त्र मानवंदना दिली. यावेळी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली. पुत्र आमदार कुणाल पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

*यांनी घेतले अंत्यदर्शन*

प्रारंभी, राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज, पर्यटनमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे
पालकमंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी त्यांच्या राहत्या घरी जावून माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

बातमी शेअर करा
Previous Post

इंधन वाहून नेणाऱ्या मालगाडीचे डब्बे रुळावरुन घसरल्याची बातमी, यंत्रणांनी घटनास्थळाकडे धाव…

Next Post

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ३ हजार कामगार संचांचे वितरण

Next Post
आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ३ हजार कामगार संचांचे वितरण

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते ३ हजार कामगार संचांचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add