नंदुरबार l प्रतिनिधी
येथे नंदुरबार जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेचे आयोजन स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जलतरण तलाव येथे आयोजित करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक किरण रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळीकिरण रघुवंशी यांनी जलतरण खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्यावतीने व वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्स शिक्षण सांस्कृतिक संस्था नाशिक यांच्या सहकार्याने स्पर्धा घेण्यात आली. यावेळी राज्य स्विमिंग संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र निंबायते, प्राचार्य पुष्पेंद्र रघुवंशी, जिल्हा क्रीडा कार्यालयाचे मुकेश बारी, क्रीडा अधिकारी संजय बेलोरकर, क्रीडाशिक्षक डॉ.मयूर ठाकरे, महेंद्र फटकाळ, दिनेश बैसाणे, संदीप पाटील, जगदीश बछाव, मनीष सनेर, जगदीश वंजारी, भरत चौधरी, कल्पेश बोरसे, दिनेश वाडेकर आदी उपस्थित होते. स्पर्धेत १४, १७ व १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींनी सहभाग नोंदविला. यावेळी राजेंद्र निंबायते यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करताना जलतरण खेळाविषयी माहिती देत त्याचे फायदे व निरोगी शरीर राहण्यासाठी होणारी मदत शालेय स्पर्धेतून खेळाडूंना नियम नियमावली समजावून सांगितली.
या स्पर्धेतून विजेते खेळाडू नाशिक विभागीय स्पर्धेमध्ये नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. स्पर्धेत प्रथम दोन क्रमांकाचे खेळाडू विभागीय पातळीवर खेळतील. स्पर्धा यशस्वीतेसाठी पंच म्हणून अमोल भोयर, नरेंद्र पाटील, पप्पू राजपूत, अमित गावित, राजेंद्र सिंधीकर, पाठक मॅडम आदींनी परिश्रम घेतले.