तळोदा | प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बंद केलेली सिलिंगपूर बस सुरू करावी अशी मागणी गावकर्यांसह आदिवासी युवा शक्ती कडून करण्यात आली आहे.
याबाबत तळोदा बस स्थानकातील कर्मचारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. कोरोना महमारीच्या पार्श्वभूमीवर तळोदा बस स्थानकातून सकाळी व दुपारी सोडण्यात येणारी तळोदा – सिलिंगपूर ही बस बंद करण्यात आली होती.तथापि कोरोने च्या प्रादुर्भाव कमी झाल्या मुळे राज्य परिवहन महामंडळाने तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी बसेस सुरू केल्या आहेत.असे असताना अजूनही ही बस सेवा सुरू करण्यात आलेली नाही.त्यामुळे तेथील नागरिकांना नाईलाजास्तव खासगी वाहतुकीच्या सहारा घ्यावा लागत आहे.त्यातही सध्या शासनाने शाळा,महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने गेल्या आठवड्या पासून शाळा ही सुरू झाल्या आहेत. परंतू बस अभावी विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही.परिणामी त्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे.आधीच कोरोना महामरित विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.ते आता सुरळीत होत असताना एस टी महामंडळाने बस बंद ठेवून त्यात भर टाकली आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान व गावकर्यांची गैरसोय लक्षात घेवून अधिकार्यांनी तातडीने बंद ठेवलेली बस सुरू करावी. अशी मागणी जय आदिवासी युवा शक्तीचे विनोद माळी,हिरामण वळवी,शिवाजी डोंगरे, इलामसिंग पवार,बेबिबाई मार्गे,छाया डोंगरे, रीना ठाकरे,सुरेखा वळवी,कविता पवार,संजय मोरे,बबलू मोरे,कांतीलाल ठाकरे,प्रवीण मोरे,तनवीर कुरेशी,कपिल दुमकुळ,सतीश मोरे,विनोद डोंगरे आदींनी केली आहे.








