नंदुरबार l प्रतिनिधी
येथील पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांना शिवसेना उबाठा पक्षामार्फत रस्त्यांवरील खड्ड्याबाबत निवेदन देण्यात आले. 2 सप्टेंबर पर्यंत रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती न झाल्यास पालिका कार्यालयात टाळा ठोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी निवेदनात दिलेला आशय असा नंदुरबार शहरात काही दिवसांवर आलेले सण म्हणजे दहिहंडी, पोळा, गणपती, नवरात्र, दिवाळी सारख्या सणा मध्ये मिरवणुक निघत असतात परंतु नंदुरबार नगर परिषदेच्या हद्दीत येणारे सर्व रस्त्याची अवस्था ही अतिशय दयनीय झालेली आहे. प्रत्येक रस्त्यावर मोठ मोठे खड्डे, पाणी साचण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात तसेच, साडपाणी हे रोडावर व घरात साचत आहे परंतु नगर परिषदेचे याकडे कोणत्याही प्रकारचे लक्ष नाही. नंदुरबार शहरात रोज लहान मोठे अपघात होवुन नुकसान होत आहे तरीही नगर पालिका हे खड्डे बुजवत नाही किंवा काहीही एक कार्यवाही करित नाही.
नगर परिषदेचे आजी माजी नगरसेवक यांचे कॉन्ट्रॅक्टर, ठेकेदार हे फक्त मलिदा लाटण्याचे काम करतात परंतु प्रत्यक्ष काहीही काम होत नाही व नविन रोड निर्माण होत नाही. तसेच नगर परिषदेचे कर्मचारी व संबंधीत कर्मचारी यांच्यावर काही मोठी घटना घडल्यास त्यांच्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
तरी आपणास निवेदन देण्यात येते की, सदर खड्डे दिनांक ०२/०९/२०२४ रोजी पर्यंत डांबरीकरण करुन बुजविण्यात यावे असे न केल्यास नगर परिषेस टाळा ठोक आंदोलन व खड्डयात झाडे लावा आंदोलन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामार्फत करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.
निवेदनावर शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा महानगरप्रमुख पंडित माळी, जिल्हा महिला आघाडी प्रमुख रीना पाडवी, जिल्हा उपप्रमुख अर्जुन मराठे, युवा सेना उपाध्यक्ष सागर पाटील, युवा सेना शहराध्यक्ष दादा कोळी, शहर संघटक भक्तवत्सल सोनार, वाहतूक सेना उपजिल्हाप्रमुख छोटू चौधरी, उपमहा नगर प्रमुख इम्तियाज कुरेशी, युवा सेना उपाध्यक्ष एजाज काजी, वाहतूक सेना जिल्हाप्रमुख धारू कोळी यांच्या सह्या आहेत