Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नामुळे नंदुरबार शहरातील सुमारे 9 कोटी 50 लाख रुपयांच्या आणखी 12 समाज मंदिरे आणि सभागृह बांधणीच्या कामांना मंजूरी

team by team
August 26, 2024
in राजकीय
0
मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नामुळे नंदुरबार शहरातील सुमारे 9 कोटी 50 लाख रुपयांच्या आणखी 12 समाज मंदिरे आणि सभागृह बांधणीच्या कामांना मंजूरी

नंदुरबार l प्रतिनिधी-

महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे नंदुरबार शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमधील आणखी 12 समाज मंदिरे आणि सभागृह बांधणीच्या कामांसाठी सुमारे 9 कोटी 50 लाख रुपये इतका निधी मंजूर झाला असून या कामांना मान्यता मिळाली आहे.

नंदुरबार शहरातील प्रत्येक विभागाला प्रत्येक प्रभागाला विकास निधी प्राप्त करून देण्यासाठी आणि प्रत्येक प्रभागातील कामांना गती देण्यासाठी महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित हे सातत्याने प्रयत्नशील असतात. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी या कामासाठी सुद्धा प्रयत्न चालवले होते. त्या संदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, “नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान” या योजनेंतर्गत नंदूरबार नगरपरिषदेला रक्कम रु.९,५०,००,०००/- (अक्षरी रक्कम रु. नऊ कोटी पन्नास लक्ष मात्र) इतका निधी विविध कामांकरीता मंजूर करण्यात आला आहे. सदर प्रकल्प खर्चाचा १००% हिस्सा राज्य शासनाचा राहणार आहे. सदर शासन निर्णयातील कामाच कार्यान्वयन यंत्रणा “सार्वजनिक बांधकाम विभाग” राहील, असे शासन निर्णयात स्पष्ट नमूद केले आहे.

 

निधी मंजूर झालेल्या नंदूरबार नगरपरिषद क्षेत्रातील कामे 12 कामांची यादी याप्रमाणे:

1. प्रभाग क्रमांक १६ मधील चव्हाण चौक येथील सामाजिक सभागृहाचे पहिल्या मजल्याचे बांधकाम करणे.

रुपये 50 लक्ष

2. गवळीवाडा येथील नपाचे सामाजिक सभागृहाचे वाढीव बांधकाम करणे. 1कोटी रुपये

3. प्रभाग क्र-१० मधील देसाईपुरा येथील श्री वैष्णव दसा पोरवाड पंच पोरवाल वाडी येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे. 1कोटी 50 लक्ष रुपये

4. श्री समस्त श्रीमाळी ब्राम्हण पंच नंदुरबार रंगमहल गल्ली येथे सामाजिक सभागृह बांधणे. 1 कोटी रुपये

5. समस्त ब्राम्हण पंच मंडळी ब्राम्हणवाडी नंदुरबार शहर येथे नपाचे सामाजिक सभागृह बांधणे. 1 कोटी 50 लक्ष रुपये

6. गुरव समाज वस्ती नंदुरबार शहर येथे नपाचे सामाजिक सभागृह बांधणे. 1कोटी रुपये

7. जेष्ठ नागरिकांकरिता कमलकुंजनगर, नळवा रोड, नंदुरबार येथे नपाच्या खुल्या जागेत डोम उभारणे. 50 लक्ष रुपये

8. जेष्ठ नागरिकांकरिता कमलकुंज नगर नळवा रोड नंदुरबार येथे नपाच्या खुल्या जागेत चौथरा तयार करणे. 50 लक्ष रुपये

9. प्रभाग क्र.१ मध्ये सोहम पार्क च्या खुल्या जागेवर आदिवासी समाज मंदीर बांधणे. 50 लक्ष रुपये

10. प्रभाग क्र.३ मध्ये गुजर न्हावी समाजासाठी श्री शिवाय कॉलनी नंदुरबार येथे समाज मंदीर बांधणे. 50 लक्ष रुपये

11. प्रभाग क्र-१७ उघडेश्वर महादेव मंदीर परिसरात समाज मंदीर बांधणे. 50 लक्ष रुपये

12. बडगुजर समाज उन्नती मंडळ, नंदुरबार येथे समाज मंदीर बांधणे. 50 लक्ष रुपये

बातमी शेअर करा
Previous Post

बँकेच्या रांगेत महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून डॉ.गोऱ्हे यांच्याकडून स्वखर्चातून २ लक्ष रुपयांची घोषणा

Next Post

नंदुरबारात महादेव मूर्तीची शोभायात्रा; भर पावसात भाविक भक्तीरसात चिंब

Next Post
मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रयत्नामुळे नंदुरबार शहरातील सुमारे 9 कोटी 50 लाख रुपयांच्या आणखी 12 समाज मंदिरे आणि सभागृह बांधणीच्या कामांना मंजूरी

नंदुरबारात महादेव मूर्तीची शोभायात्रा; भर पावसात भाविक भक्तीरसात चिंब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add