नंदुरबार l प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसंदर्भात निनावी, अपरिचीत मोबाईल क्रमांकावरुन बँक खात्याचा तपशिल विचारल्यास कोणतीही माहिती पुरविण्यात येऊ नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केल आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागामार्फत 21 ते 65 या वयोगटातील विवाहित, निराधार, निराश्रित, विधवा, परितक्त्या महिलांना शासनामार्फत दरमहा रु 1500 प्रमाणे त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरण पध्दतीने रक्कम जमा करण्यात येत असुन लाभार्थी महिलांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरु असून बऱ्याच लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कमा जमा झाल्या आहेत.
लाभार्थी महिलांच्या खात्यातुन ऑनलाईन पध्दतीने रक्कमा काढल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेसंदर्भात निनावी अपरिचीत मोबाईल क्रमांकावरुन बँक खात्याचा तपशिल आयएफसी कोड, पासवर्ड, ओटीपी क्रमांक इत्यादी माहिती विचारल्यास सबंधीत निनावी, अपरिचीत फोन करणाऱ्यास कोणतीही माहिती देवू नये.
अन्यथा त्यांच्या खात्यातुन परस्पर रक्कम काढली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी लाभार्थी महिलानी याबाबत जागरुक व दक्ष रहावे तसेच निनावी, अपरिचीत मोबाईल क्रमांकावरुन फोन आल्यास त्याना कोणतेही माहिती न पुरवता आपल्या बँकेशी प्रत्यक्ष संपर्क साधुन त्याबाबत खात्री करावी असेही श्री. वंगारी, यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकानुसार कळविले आहे.