नंदुरबार l प्रतिनिधी
कोलकत्ता येथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर अत्याचार करीत तिची हत्या करण्यात आली, या घटनेच्या निषेध म्हणून २१ ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, नागरिक, रुग्ण सेवा देणाऱ्या रुग्णालयातील कर्मचारी मिळून बुधवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास संयुक्त विराट मोर्चा काढण्यात आला.
नंदुरबार येथील पंडित जवाहरलाल नेहरू पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ करण्यात येऊन. हा मोर्चा दगडी चाळ मार्गे नवीन नगरपालिका ते पंडित जवाहरलाल नेहरू पर्यंत काढण्यात आला. होणारे अत्याचार हे निषेधार्थ असून आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
खूप झाले खूप शिकल्या मुली,आता मुलींच्या सुरक्षेसाठी सर्वांना जागे करावे लागेल. मुलींना लढावे लागेल. यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी डॉ.अथर्व पवार, डॉक्टर संमिधा नटावदकर, डॉ. शुभम जाधव, डॉ.धीरज रायते, डॉ.सार्थक गुंजाळ,डॉ. शिफा सारंग, डॉ.अमोल मुंडे, डॉ.स्नेहल पठारे आदी विद्यार्थी उपस्थित होते