नवापूर l प्रतिनिधी-
नवापूर तालुक्यातील वावडी प्राथमिक आरोग्य केंद्रात सी. एस. आर.फंडातुन नवीन अत्याधुनिक रुग्णवाहीचे लोकार्पण जि.प सदस्य अजित नाईक यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ फोडुन करण्यात आला.
यावेळी जि.प.सदस्य मधुकर नाईक,पं.स सदस्य दशरत गावीत,वावडी गावाच्या सरपंच मनोहर गावीत,उपसरपंच भुपेंद्र वसावे,नवागाव सरपंच प्रकाश नाईक,ग्रा म सदस्य जिवन गावीत,नवापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा मावची,डॉ. डी.एम.सोनार,डॉ.किर्तीलता वसावे,डॉ. स्मिता वसावे,सह आरोग्य कर्मचारी व वावडी गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते.वावडी गावात बऱ्याच दिवसापासुन रुग्णवाहीका जुनी झाली होती. मात्र नंदुरबार जिल्हाचे पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी, नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या प्रयत्नाने व जि.प सदस्य अजित नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे नविन रुग्णवाहीका मिळाली आहे.त्याच प्रमाणे हायमस लेंम्प व आदिवासी उपयोजना अंतर्गत दुहेरी पंप, डी. सी. फ्रिज,वावडी प्राथमिक आरोग्य केंद्राला जि.प. सदस्य अजित नाईक यांनी मिळुन दिले आहे.तसेच उमराण प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सुध्दा आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या कडे पाठपुरावा करुन या योजनाच्या लाभ मिळवुन देण्याचा आमचा प्रयत्न राहील असे मनोगत व्यक्त करतांना जि.प.सदस्य अजित नाईक यांनी सांगितले.








