Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

लोक कल्याणाच्या ध्येयाने झपाटलेले अतुलनीय नेतेः डॉ. विजयकुमार गावित

Mahesh Patil by Mahesh Patil
August 15, 2024
in राजकीय
0
लोक कल्याणाच्या ध्येयाने झपाटलेले अतुलनीय नेतेः डॉ. विजयकुमार गावित

 

 

आमचे सर्वांचे लाडके साहेब म्हणजे, डॉ. विजयकुमार गावित हे गतिमान लोकविकासाचे अजोड कर्तृत्व लाभलेले एकमेव नेते आहेत; ज्यांच्या व्यक्तीमत्वाला असंख्य पैलू लाभलेले असून ते खरोखरचे लोकनेते आहेत. कवडीचाही लोकविकास न करणारे फुटकळ राजकीय पुढारी आजकाल सहजपणे लोकनेता अथवा कार्यसम्राट हे बिरूद मिरवतात. परंतु डॉ. विजयकुमार गावित हे खरोखरचे कार्यकर्तृत्व लाभलेले उत्तुंग नेते आहेत.

 

राजकारणाच्या आकाशपटलावर आपल्या विकासकार्याचे उंचच उंच मनोरे रचणारा असा दुसरा ‘लोकनेता’ येथे होणे नाही ! हे म्हणणे अतिशयोक्तीचे नसून मोठे वास्तव आहे. आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून जनसमुहांचे कल्याण करणारे जे एकामागून एक धडाकेबाज निर्णय त्यांनी केले त्यावरून या म्हणण्याचा अंदाज यावा. मितभाषी तरीही सुसंवादी, वागण्या बोलण्यात अॅटीट्यूड न ठेवता सर्व प्रकारच्या लोकांना आपलेसे करणारे, सहकार्याला तत्पर राहून वंचितांना साथ देणारे, त्याच बरोबर प्रचंड संयमीत राहून दूरदृष्टीने निर्णय करणारे आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांचा विश्वास जिंकणारे व्यक्तीमत्व त्यांना निसर्गतः लाभलेले आहेच.

 

सलग दिवस-रात्र न झोपता कार्यरत राहण्याची प्रचंड कार्यक्षमता आणि लोकांच्या कामातच मग्न राहण्याची आवड देखील त्यांना निसर्गतःच लाभली आहे. दिनदुबळा वर्ग प्रगतीपथावर आला पाहिजे, आदिवासी असो की बिगर आदिवासी ज्याच्या हक्काचे जे आहे, ते त्यांना मिळालेच पाहिजे; ही त्यांची विचारधारा असून लोकांचे काम; हा जणू त्यांचा श्वास बनला आहे.

 

दिवसभर विविध बैठका, चर्चा, सभा सलगपणे पार पाडता पाडता भेटायला आलेल्यांचे म्हणणे सविस्तर ऐकणे, संबंधीत अधिकाऱ्यांशी त्वरीत संपर्क करून गुंता सोडवणे ते करतातच, दुरगामी नियोजनाच्या संदर्भाने भेटी गाठीसाठी घेत मध्यरात्रीपर्यंत न थकता हे गाव ते गाव फिरतात. शिवाय पहाटेच्या वेळेत अल्प झोप घेऊन लगेचच आलेले अर्ज, पत्र तपासत बसतात. रेल्वे प्रवास असो की कारने प्रवास असो दुरध्वनीवरील संपर्क करणे, कागदपत्र वाचून फाईली हाताळणेसुध्दा चालू राहते. हे सर्व कशासाठी? तर, जनविकासाच्या कामांना गती देण्यासाठी.. दिवसा, रात्री आणि पहाटेसुध्दा सतत लोकांसाठी कार्यरत राहणारे हे असे नेतृत्व अजोड आणि अतुलनीयच म्हणावे!

 

 

प्रत्येक निर्णय दुरदृष्टीने घेतलेला, प्रत्येक काम जनसमुहाच्या हिताचे केलेले, प्रत्येक काम इतिहास रचणारे, ही त्यांच्या राजकीय वाटचालीची खासीयत सांगता येइल. जसे की, राजकारणात पदार्पण केल्या बरोबर नंदुरबार जिल्हानिर्मिती करून त्यांनी दुर्गम भागातील आदिवासींच्या दारी प्रशासन आणले. लहान मोठ्या कामांसाठी शेकडो मैल पायपीट करणाऱ्या आदिवासी बांधवांना गावातच न्याय उपलब्ध करून दिला. हा मोठा इतिहास घडला.

 

 

पुढे मंत्री बनल्यावर आदिवासी विकास खात्याच्या माध्यमातून निर्णय करतांना त्यांनी अशी काही जादू घडवली की, जिथे पायी जाणे शक्य नव्हते, तिथे पक्के डांबरी, सिमेंटचे रस्ते बनले, धरण बांधले गेले, शेती सुजलाम सुफलाम बनली. फाटक्या लंगोटमधे दिसणारे कुपोषण, अनारोग्य झेलणारे आणि धनधान्यासाठी पडेल ती चाकरी करणारे असंख्य आदिवासी समुह आज चकचकीत चारचाकीचे आणि घरबंगल्यांचे मालक बनलेले पहायला मिळतात.

 

 

हाही इतिहास एकमेव डॉ. गावित यांनी राज्यशासनाच्या माध्यमातून रचलेला. यात अतिशयोक्ती अशी काहीच नाही. २५ वर्षापूर्वीचा मागास, अविकसीत नंदुरबार जिल्हा ज्यांनी पाहिलेला, त्यांना हे नक्कीच कळू शकते. आज टोलेजंग इमारती, बहुविध व्यवसायांनी आणि भव्य प्रशस्त स्थळांनी नटलेला नंदुरबार जिल्हा पहायला मिळतो. मंत्रीपदांचा लाभ करून देत या जिल्ह्याचा त्यांनी संपूर्ण कायापालट घडवला.

 

बालमृत्यू कमी झाले. आरोग्य सेवा सुदृढ करणारा निधी आणि सुविधा आल्या. रुग्णालयांसह वैद्यकीय महाविद्यालय स्थापनेपर्यंतचा विकास त्यांनीच साधला. शहराला उड्डाणपुल दिले, नाट्यमंदिर उभारायला निधी दिला, ग्रामीण रस्त्यांच जाळं विणलं, जलशुध्दीकरण केंद्र दिले,

 

 

प्रकाशा, सारंगखेडा बॅरेजसह छोट्या मोठ्या सिंचन योजना पूर्णत्वास आणल्या. कोटी कोटीचे विकास निधी त्यांनी मिळवून दाखवला. म्हणूनच मतदारांनी त्यांना वारंवार निवडून दिले. मागील दोन वर्षाचा अपवाद वगळता तब्बल आठ वर्ष डॉ. विजयकुमार गावित हे मंत्रीपदावर नव्हते. परंतु त्या काळात हा जिल्हा पूर्ण ओस पडलेला दिसला. ना कोणताही ठोस निधी ना कोणतेही ठोस विकास काम काहीही होतांना दिसलं नाही. त्या काळात गावित परिवाराच्या सर्व विरोधकांचा नाकर्तेपणा उघड झाला.

 

डॉ.गावित हे करु शकतात, कारण लोकविकासावर आधारलेले सकारात्मक राजकारण, हे या मागचे गमक आहे. लोकसमुहांना विकासाच्या मार्गावर आणणारे रचनात्मक राजकारण करण्यात यशस्वी झालेले नामदार डॉ. गावित हे एकमेवाद्वितीय नेते आहेत. असे असतांना विद्यमान स्थितीत कटकारस्थानातून आणि व्यक्तीद्वेषातून त्यांच्या विकास रथाला अडथळे आणले गेले, हे दुर्दैव आहे. परंतु इतरांचे नाकर्ते नेतृत्व स्विकारून काहीही साध्य होणार नाही, हे लोकांना अल्पावधीतच लक्षात येऊ लागले आहे.

 

 

नामदार डॉ. विजय कमार गावित यांच्या मार्गदर्शनात घडलेल्या आणि त्याच धाटणीची वाटचाल करणाऱ्या कन्या भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या तथा माजी खासदार डॉ. हिना विजयकुमार गावित आणि नंदुरबार जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांची राजकीय कारकिर्द याहून निराळी नाही. लहान लहान दुर्लक्षीत घटकांना आर्थिकविकासापासून सर्व काही देणारे राजकारण त्यांनी साधले आहे.

 

आताच्या शिंदे-फडणवीस सरकारमधे आदिवासी विकास खात्याचं मंत्रीपद मिळून त्यांना दोनच वर्ष झाले. तरी मागील २० वर्षात कोणताही नेता देऊ शकला नाही, इतका निधी या अल्प काळात त्यांनी जिल्ह्याला मिळवून दिला. आदिवासी मुलांच्या निवासी शाळांना स्वमालकीच्या इतारती उभारून मिळताहेत. दुर्गमभागातील आदिवासी विद्यार्थ्यांना डिजिटल सेवा पुरवल्या जाताहेत.

 

आदिवासी वसतीगृह असो निवासी शाळा असो लॅपटॉप, टॅब, वॉटरफिल्टर आदी आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज बनवले जात आहेत. गोरगरीब जनतेला मोफत नेत्रचिकित्सा आणि शस्त्रकिया करून दिल्या जात आहेत. भाजपाने उशिराने दिलेली मंत्रीपदाची संधी डॉ. विजयकुमार गावितांच्या कार्यकक्षा जितक्या वाढवणारी, तितकीच ती भारतीय जनता पार्टीलाही अधिक लाभदायी ठरलेली दिसते.

 

आदिवासी विकास खात्याच्या चमकदार कामगिरीतून संपूर्ण राज्य ते पहात आहे. नंदुरबारचं मागासलेपण सांगायला पुढे आलेल्या एका तरी माजी मंत्र्याच्या हातून अशी कामगिरी घडली आहे का? ही तुलना लोक नक्कीच करतील. नामदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या लोकविकासाच्या राजकारणाला जिवंत ठेवण्याचा संकल्प करणे, हीच या लोकनेत्याच्या आजच्या वाढदिवसाला खरी शुभेच्छा ठरेल !

जे. एन. पाटील, तालुका अध्यक्ष, भाजपा नंदुरबार.

बातमी शेअर करा
Previous Post

माळीवाडा परिसरात नेत्र तपासणी शिबिर, मुख्यमंत्री वयोश्री योजनेची करण्यात आली जनजागृती

Next Post

जिल्हयातील 2 पोलीस अधिकारी यांना “विशेष सेवा पदक”जाहीर

Next Post
जिल्हयातील 2 पोलीस अधिकारी यांना “विशेष सेवा पदक”जाहीर

जिल्हयातील 2 पोलीस अधिकारी यांना "विशेष सेवा पदक"जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रॉफ हायस्कूलमध्ये भूगोल विभागातर्फे “राष्ट्रीय अवकाश दिन” साजरा

श्रॉफ हायस्कूलमध्ये भूगोल विभागातर्फे “राष्ट्रीय अवकाश दिन” साजरा

August 28, 2025
बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप: नवीन कार्यपद्धती जाहीर : मधुरा सुर्यवंशी

बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे वाटप: नवीन कार्यपद्धती जाहीर : मधुरा सुर्यवंशी

August 28, 2025
जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत,जिल्ह्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन

जिल्ह्यात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत,जिल्ह्यात आरोग्य शिबिरांचे आयोजन

August 28, 2025
शैक्षणिक संस्थांना कारणे दाखवा नोटीस देणार: शिक्षण विभाग,क्रीडा गणवेशबाबत ७ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे

शैक्षणिक संस्थांना कारणे दाखवा नोटीस देणार: शिक्षण विभाग,क्रीडा गणवेशबाबत ७ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे

August 28, 2025
रघुवंशी परिवाराचे शनिमांडळ येथील निष्ठावंत कार्यकर्ते संतोष पाटील यांचा भाजपात प्रवेश

रघुवंशी परिवाराचे शनिमांडळ येथील निष्ठावंत कार्यकर्ते संतोष पाटील यांचा भाजपात प्रवेश

August 28, 2025
अल्पसंख्यांक समाजा सोबत राष्ट्रवादी भक्कमपणे उभी : आमदार ईद्रीस नाईकवाडी

अल्पसंख्यांक समाजा सोबत राष्ट्रवादी भक्कमपणे उभी : आमदार ईद्रीस नाईकवाडी

August 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group