नंदुरबार l प्रतिनिधी-
केंद्र शासनाच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले.याशिवाय तहसीलदार नंदुरबार, नवापूर तळोदा,अक्कलकुवा, शहादा, धडगाव,पोलीस निरीक्षक यांना देखील निवेदन देण्यात आले. महा विकास आघाडी घटक पक्षांनी पुकारलेला महाराष्ट्र बंदला नंदुरबार शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.तसेच जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
नंदुरबार येथे कॉंग्रेस कमिटीतर्फे उपजिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेमध्ये असलेल्या असलेल्या महा विकास आघाडीतील कॉंग्रेस पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे. आज नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस कमिटी तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नंदुरबार जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.केंद्रामध्ये सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या शासनाने शेतकर्याच्या विरोधामध्ये केलेल्या काळया कायदयाच्या विरोधामध्ये तसेच गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या शेतकरी आदोलनाला चिरडण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्या प्रयुक्त्या केंद्र सरकारने केल्या एवढेच नव्हे तर शेतकर्यावर बळाचा वापर करून लाठीचार्ज करून पाण्याचा मारा करून आणि आणि गुडाच्या मार्ङ्गत हल्ले करून त्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला तरीदेखील शेतकरी न्याय हक्कासाठी संसदीय मार्गाने लढा देत आहे आणि त्याचा हा लढा सुरूच आहे.भारतीय जनता पार्टीचे मंत्री यांच्या मुलाने शेतकर्यांच्या आंदोलनावर बेभानपणे कार चालू शेतकर्याना चिरडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या गाडीमुळे काही शेतकर्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे . या परिस्थितीची दखल सर्वच पक्षाने घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा शेतकर्यांच्या हक्काच्या समर्थनार्थ सर्व पक्ष संसदीय मार्गाने लढा देण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आहेत. ज्या शेतकर्याचा मृत्यू लखीमपुर खेरी येथे झाला त्यांच्या परिवारांना भेट देण्यासाठी आणि त्यांचे सांत्वन करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भेट देण्याचा प्रयत्न केला त्यांना तेथील सरकारने रस्त्यावरच आडवले एवढेच नव्हे तर त्यांना डांबून ठेवण्यात आले.लोकशाही मार्गाने सुरू केलेल्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न केंद्रातील सरकार सातत्याने करीत आहे. त्याचा निषेध म्हणून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ,शिवसेना शिवसेनेचे प्रदेश प्रमुख आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या आवाहनानुसार आणि नंदुरबार जिल्ह्याचे पालक मंत्री ऍड. के.सी.पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री पद्माकर वळवी,कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतत्वाखाली आज बंद पकारण्यात आलेला आहे देशामध्ये शेतकरी विरोधी कायदे करणार्या भाजपा सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो यापढेही केंद्रातील सरकारने शेतकर्यांचे आंदोलन बळाचा वापर करून उधळन लावण्याचा प्रयत्न केल्यास महा विकास आघाडी सरकारचे सरकारमध्ये सामील असलेल सर्व पक्ष संसदीय मार्गाने आदोलन तीव्र करतील याची दखल शासनाने घ्यावे.शेतकर्यांवर बेभानपणे गाड्या चालवू त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तीवर तातडीने कारवाई करावी. केंद्र सरकारने शेतकांच्या विरोधामध्ये पारित केलेले काळे कायदे त्वरित रद्द करावे असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष एजाज बागवान, चिटणीस पंडित पवार, विश्वास वळवी, महेश गव्हाणे, रवींद्र कोठारी, शांतीलाल पाटील ,रऊप शाह, दिलावर शाह, स्वरूप बोरसे, शमा शेख, भावना गवाले यांच्या स्वाक्षर्या आहेत.








