Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात विद्युतीकरणासाठी 400 कोटींचा निधी : डॉ. विजयकुमार गावित

team by team
August 1, 2024
in राजकीय
0
जिल्ह्यात विद्युतीकरणासाठी 400 कोटींचा निधी : डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्ह्यातील वाड्यां- वस्त्या प्रकाशमान करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने ना भुतो ना भविष्यती असा 400 कोटी रूपयांचा निधी विद्युतीकरणासाठी दिला असून शेतकरी, कामगार, महिला व युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे.

ते कामगार कल्याण मंडळाच्या वतीने नंदुरबार तालुक्यातील उमरदे आणि कोपर्ली येथे गृहपयोगी वस्तु, सुरक्षा संच वितरण तसेच विविध विकास कामांच्या भुमीपुजनप्रसंगी बोलत होते. यावेळी जितेंद्र पाटील, ए.बी. गांगुर्डे, सागर साळुंखे, रामभाऊ बेंद्रे, कमलेश चौधरी, ज्ञानेश्वर पाटील, आनंदा बोराळे, मल्हारी पाटील, अर्जुन सोनवणे, गोविंदा जगताप यांच्यासह परिसरातील अधिकारी, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, विद्युतीकरणात पिछाडीवर असलेला जिल्ह्याच्या विद्युतीकरणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे यासाठी चालू वर्षात सुमारे 400 कोटी रूपयांचा निधी आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. येत्या काही महिन्यातच जिल्ह्यातील वाड्या-वस्त्या प्रकाशमान झालेल्या आपल्याला दिसतील. त्याच बरोबर जिल्ह्यातील यात्रास्थळांच्या विकासाबरोबरच मंदिरांच्या जिर्णोद्धारासाठीही भरीव निधी दिला जात आहे. गावातील सुख-शांती, धार्मिकता, अधियात्मिकता, सांस्कृतिक मुल्ये वृद्धींगत व्हावी त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत, त्यासाठीही भरीव निधी दिला जात आहे. महाराष्ट्र शासनाने बांधकाम करत असलेल्या नागरिकांना म्हणजेच बांधकाम कामगारांच्या हितार्थ एक अतिशय महत्वपूर्ण व लाभदायी योजना सुरू केली जिचे नाव बांधकाम कामगार योजना 2024 आहे. या योजनेच्या माध्यमातून कामगारांना गृहोपयोगी वस्तु व कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या सुरक्षा विषयक साधनांचा संच दिला जातो.

चार भिंतींच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राबणाऱ्या कामगारांचीही सुरक्षाही तितकीच महत्वाची असल्याची लक्षात आल्यानंतर बांधकाम कामगारांना बूट, धुळीपासून संरक्षण करण्यासाठी तोंडाला डस्ट मास्क, डोक्यासाठी सेफ्टी हेलमेट पुरवण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगारांना सेफ्टी संच दिले जात आहेत.

शहरीकरण झपाट्याने होत आहे. शहरांकडे नागरिकांचे स्थलांतरीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहत आहे. या इमारती उभ्या करण्यासाठी हजारो कामगार दररोज काम करत असतात. या इमारतींच्या बांधकामासाठी लागणारा कच्चा माल तयार करण्याच्या उद्योगांतही हजारो कामगार काम करत आहे. या कामगारांच्या सुरक्षेसाठी काय खबरदारी घेणे गरजेचे आहे. बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगारांना सुरक्षा संत दिले जाणार आहेत. यासाठी सरकारी कामगार अधिकाऱ्यांकडे किट मागणी अर्ज कामगारांना करावा लागणार आहे. अर्ज आल्यानंतर अधिकारी किटचे वाटप करतील. सहाय्यक कामगार आयुक्तांनी प्रमाणित केलेल्या कामगारांच्या यादीनुसार किटचे वाटप करण्यात येत असल्याचेही यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनांच्या माध्यमातून शासनाने सर्व वर्गातील घटकांचा विचार करून योजना आणल्या असून या योजनांचा लाभ सर्वांनी घ्यावा असेही यावेळी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यावेळी सांगितले.

*सातशे संचांचे वितरण…*
यावेळी उमरदे येथे 100 सुरक्षा संच, 250 गृहोपयोगी वस्तू, कोपर्ली येथे 100 सुरक्षा संच तसेच या 250 गृहपयोगी वस्तुंचे असे एकूण 700 नोंदीत कामगारांना संचांचे वितरण करण्यात आले.

*ही आहेत 30 प्रकारची भांडी गृहोपयोगी भांडी…*
ताट 04, वाट्या 08, पाण्याचे ग्लास 04, पातेले झाकणासह 03, मोठा चमचा (भातवाडी) 01, मोठा चमचा (वरणवाडी) 01, पाण्याचा जग 01, मसाला डब्बा 01, डब्बा झाकणासह (14 इंच) 01, डब्बा झाकणासह (16 इंच) 01 डब्बा झाकणासह (18 इंच) 01, परात 01, प्रेशर कुक्कर 01 व कढई 01.

 

*या आहेत सुरक्षा संचातील वस्तु…*
पाठीवर अडकवली जाणारी बॅग, काम करतांना घालण्यासाठी लागणारे एक जॅकेट, हेल्मेट, जेवणासाठी 4 कप्प्यांचा डबा, पायात घालण्यासाठी बूट, सोलर टॉर्च, सोलर चार्जर, पाणी पिण्यासाठी लागणारी बॉटल, चटई, मच्छरदाणी जाळी, इमारतीवर काम करतांना लटकण्यासाठी लागणारा बेल्ट, हातमोजे.

बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पदाधिकार्‍यांचा राजीनामा

Next Post

अवघ्या दोन वर्षात दिले तेवढे लाभ आमच्या विरोधकांनी मागच्या तीस वर्षात दिलेत का? : डॉ. विजयकुमार गावित

Next Post
अवघ्या दोन वर्षात दिले तेवढे लाभ आमच्या विरोधकांनी मागच्या तीस वर्षात दिलेत का? : डॉ. विजयकुमार गावित

अवघ्या दोन वर्षात दिले तेवढे लाभ आमच्या विरोधकांनी मागच्या तीस वर्षात दिलेत का? : डॉ. विजयकुमार गावित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

नंदुरबार तालुक्यातील ८०० हून अधिक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

February 7, 2026
खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

खोंडामळी येथे माता वाघेश्वरी देवीची भक्तिमय प्राणप्रतिष्ठा

February 7, 2026
नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

नवापूर तालुक्यात 10 फेब्रुवारीपासून ‘हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम’

February 7, 2026
नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी  आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

नंदुरबार येथे ८ फेब्रुवारी रोजी आदिवासी विकास मंत्र्यांच्या उपस्थितीत वनहक्क पट्टे वाटप मेळावा

February 7, 2026
उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

उबाठा तर्फे हेल्मेट घालूनच दिले निवेदन, कारवाई नको ‘दंडाआधी हेल्मेट’ची मागणी

February 7, 2026
केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

केंद्रीय अर्थसंकल्पामुळे विकासाला नवी दिशा : डॉ. हिना गावित

February 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add