नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग यांच्या आदेशान्वये आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत श्रीमती क .पू. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यालयात विविध उपक्रम घेण्यात आले.
त्यात प्रामुख्याने विविध आनंददायी खेळ, खेळातून शिक्षण, माता पालकांना बोलवून वृक्षारोपण , मतदार जागृती रॅली ,तंबाखू मुक्त शाळा असे विविध उपक्रम घेण्यात आले. त्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये मनोरंजनाबरोबर ज्ञान विद्यार्थ्यांना एक सक्षम व जबाबदार देशाचा नागरिक बनविणे विविध घटकांचे ज्ञान आत्मसात करणे विविध कौशल्य क्षमता निर्माण करणे.
तंबाखू मुक्त शाळा या उपक्रमात विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. तंबाखू मुळे व तंबाखूजन्य पदार्थांमुळे कोणकोणत्या प्रकारची हानी होते जसे तंबाखूमुळे तोंडाचा कॅन्सर, जेवताना परिपूर्ण अन्न तोंडात न जाणे, अन्न पचण्यासाठी असलेली लाळ तोंडातून वारंवार बाहेर फेकली जाणे यामुळे अन्नपचनासाठी विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात, त्यानंतर दारू- संसार हा उद्ध्वस्त करीत दारू बाटलीस स्पर्श नका करू असे म्हटले जाते ते उगाच नाही,
त्यानंतर विद्यार्थ्यांना विविध नशेचे दुष्परिणाम बाबत पोस्टर दाखवण्यात आले, त्यानंतर नशिल्या पदार्थांची मैदानावर होळी करण्यात आली.या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या प्राचार्या सौ.विद्या भागवत चव्हाण,पर्यवेक्षक अनिल कुवर विद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक, शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून आनंददायी शनिवार हा उपक्रम यशस्वी केला.