नंदुरबार l प्रतिनिधी
अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती या संस्थेतर्फे दि. 21 जुलै रोजी महर्षी व्यास जयंती अर्थात गुरू पोर्णिमेचे औचित्य साधून. नंदुरबार जिल्ह्यातील साहित्यिक, पत्रकार, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते, प्रकाशक यांचे एकत्रीकरण करण्यात आले. यावेळी साहित्य भारती ची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरूवात सौ. प्रतिभा कुळकर्णी यांनी गायलेल्या शारदास्तवनाने झाली. यावेळी महर्षी व्यास व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ साहित्यिक प्रभाकर भावसार यांच्या हस्ते करण्यात आले. अभिजीत खेडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तसेच मान्यवरांचा परिचय करून दिला. साहित्य भारतीचे प्रदेश सहसंघटक शशिकांत घासकडबी यांनी अखिल भारतीय साहित्य परिषद व साहित्य भारतीच्या कामाची विस्तृत माहिती दिली.
प्रमुख वक्ते – संस्कृत अभ्यासक योगेश्वर शास्त्री यांनी महर्षी व्यासांची साहित्य संपदा या विषयावर सविस्तर व अभ्यासपूर्ण मांडणी केली. यावेळी साहित्य भारतीचे जळगांव विभाग संयोजक दिनेश नाईक यांनी साहित्य भारतीची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप जेष्ठ साहित्यिक प्रभाकर भावसार यांनी केला. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
व्यासपीठावर यावेळी श्री जी वाचनालयाचे अध्यक्ष संदीप चौधरी, डॉ. माधव कदम, उपस्थित होते. तसेच पत्रकार, शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रितम निकम यांनी केले.
यावेळी जाहीर झालेली जिल्हा कार्यकारिणी अशी,
अखिल भारतीय साहित्य परिषद( पुरस्कृत)
साहित्य भारती महाराष्ट्र : जिल्हा नंदुरबार
जिल्हा कार्यकारिणी
अध्यक्ष – संदिप चौधरी
कार्याध्यक्ष – डॉ. मनोज शेवाळे
सह-कार्याध्यक्ष – दीपक कुळकर्णी
उपाध्यक्ष – १) प्रा. प्रशांत बागूल
२) प्रा. सविता पटेल
३) डॉ. विजय शर्मा
जिल्हा मंत्री – ॲड. प्रीतम निकम
सदस्य -अभिजीत खेडकर
प्रा. गणेश पाटील
भानुदास शास्त्री
सौ. ऋता चौधरी
प्रा. जयश्री नांद्रे
मान्यवर निमंत्रित सदस्य- प्रभाकर भावसार,
डाॅ. माधव कदम